वाई पंचायत समिती निवडणूक रंगतदार वळणावर
शिवशाही न्यूज, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
शेंदुरजणे गणातून रुपाली विकास गाढवे यांच्या उमेदवारीला दिवसेदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून, ही उमेदवारी भविष्यात अनेक राजकीय समीकरणांना नव्याने विचार करायला लावणारी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यांच्या पाठीशी असलेले त्यांचे पती विकास गाढवे हे स्वतः पैलवान असून, ‘पैलवान ग्रुप’चे वाई तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे.
वरखरवाडी, भोगाव, मेणवलीसह परिसरातील अनेक गावांमध्ये त्यांचा दांडगा लोकसंपर्क असून, जनतेशी असलेला थेट संवाद आणि सामाजिक सहभाग यामुळे त्यांना निर्णायक मते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रुपाली गाढवे यांची उमेदवारी ही प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असे बोलले जात आहे.
विकास गाढवे हे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे या उमेदवारीला केवळ स्थानिकच नव्हे तर व्यापक राजकीय पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे. शेंदुर्जने गणातून ही उमेदवारी ‘बेरजेच्या राजकारणाची’ नांदी ठरू शकते, यात तिळमात्र शंका नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यांचा मांढरदेव पठार व मांढरदेव धावडी गुंडेवाडी शेंदुरजणे परखंदी या गावांमध्ये त्यांचे नातेसंबंध असल्याने मित्रपरिवार ही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे राजकीय मतांची बेरीज होऊ शकते
विशेष म्हणजे, या गणातील बोपर्डी गावातून अपक्ष उमेदवारी असल्याने भविष्यात अनेकांचे राजकीय गणित बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच, शेंदुर्जने गणातील ही लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत सध्या स्पष्टपणे दिसून येत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



