अनेक सुवर्णपदकांची कमाई; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
शिवशाही वृत्तसेवा,वाई ,( प्रतिनिधी शुभम कोदे )
क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदेव स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित शालेय थाय बॉक्सिंग कोल्हापूर विभागीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेवर आपला दबदबा निर्माण केला.
मुलींच्या गटात
कुमारी अवंतिका प्रशांत शिंदे, सई विठ्ठल धायगुडे, सानिका निरज शर्मा, शुभ्रा प्रमोद शिंदे, सना वजीर शेख, काजल नरेश शर्मा, शमिका प्रमोद ढोले पाटील व वैष्णवी अनिल नलवडे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
मुलांच्या गटात
साई अनिल मालुसरे, संभव संजय यादव, विधान सचिन पवार, शौर्य राहुल जाधव, वेदान नवनाथ पडवळ व पार्थ उल्हास पानमंद यांनी सुवर्णपदक पटकावून सातारा जिल्ह्याची मान उंचावली.
या विजेत्या खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच या स्पर्धेत वैष्णवी भोरे, स्वरा मालुसरे व अथर्व तपासे यांनी कांस्यपदक मिळवले.
या स्पर्धेत पंच म्हणून - वजीर शेख, अक्षय साळुंखे, अक्षय पाटील, विशाल माळी व महांगडे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे उद्घाटन वाई वन विभाग अधिकारी निकम साहेब, वाई बाजार समिती संचालक तानाजी कचरे व ज्ञानदीप स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शुभांगी पवार मॅडम यांच्या हस्ते पार पडले.
बक्षीस वितरण समारंभ - वाई क्रीडा संघटनेचे सचिव सचिन लिंबे सर, महाराष्ट्र थाय बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष विशाल माळी सर, सफीया शेख मॅडम व सचिन तिमुणकर सर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे व पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



