कास बामणोली रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत- श्रीरंग काटेकर
शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )
जागतिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेल्या कास बामणोली परिसरात सकारात्मक बदल घडत असताना मात्र येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. कास बामणोली हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर देश विदेशातून पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. परंतु या मार्गावरील रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे हे वाहन चालकांना चुकवताना त्यांना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व्हावे अशी मागणी आता पर्यटक व ग्रामस्थांमधून होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना शिवेंद्रराजे भोसले यांनी या भागाचा विकासात्मक दृष्टिकोनातून कायापालट केलेला आहे.
अनेक गावे वाडी वस्ती पर्यंत त्यांनी सुविधा पुरविलेल्या आहेत. परंतु कास बामणोली रस्ता हा मात्र खराब झाल्यामुळे ग्रामस्थ व पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करून पर्यटक व ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी आता या परिसरातून जोर धरत आहे. या परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या असंख्य पर्यटकांच्या भेटी दिवसेंदिवस वाढत असून दळणवळणाची सोय उत्तम केल्यास या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढेल त्यासाठी कास बामणोली रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करावे. या परिसरात कास तलाव वज्रेश्वरीचा धबधबा मुनावळे पर्यटन स्थळ वसईचा किल्ला बामणोली पर्यटन तापोळा अशा ठिकाणी सुट्टीच्या दिवशी या परिसराचा मनमुराद आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक भेटी देत असतात. या रस्त्याला जोडणारी अनेक गावे असून कास गाव अंधारी मुनावळे बामणोली केळकर अन्य गावांचा या मार्गावरून ये जा मोठ्या प्रमाणात असल्याने या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण तातडीने व्हावे.
कास बामणोली परिसरातील असंख्य ग्रामस्थ कामानिमित्त व वैद्यकीय सेवेसाठी सातारा शहरात नियमितपणे येत असतात. कास बामणोली हा रस्ता खराब झाल्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: महिला वर्गांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. गर्भवती महिला या मार्गावरून प्रवास करताना त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
कास बामणोली परिसरातील निसर्ग सौंदर्याची भुरळ देश-विदेशातील अनेक पर्यटकांना पडलेली आहे त्यामुळे जागतिक स्तरावर सातारा हे पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जात आहे. या भागातील परिसरात वन्यजीवांच्या अभ्यास करण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात या पर्यटकांना सोयी सुविधा उत्तम दर्जाच्या देणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने कास बामणोली रस्ता डांबरीकरण करून पर्यटक व ग्रामस्थांना दिलासा द्याव.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



