सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
नुकत्याच जाहीर झालेल्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या निकालामध्ये श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर या शाळेचा माजी विद्यार्थी आदित्य राजेंद्र नलावडे याने गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला.
तसेच शाळेचे इतर माजी विद्यार्थी आदित्य मराठे, जानवी शेवरे व हिंदवी बोडखे यांनीही A+ श्रेणीत विशेष प्राविण्य मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
या उल्लेखनीय यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी वरील विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य श्री. संतोषजी मतसागर सर यांनी स्वतः शाळेत घेऊन येत त्यांचा सत्कार केला. तसेच शाळेच्या वतीनेही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, प्राचार्य संतोष मतसागर सर यांच्या हस्ते संबंधित शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. साबुसिंग राठोड, संचालक श्री. शिवाजी वाघ, मुख्याध्यापक श्री. प्रकाश जिरेमाळी तसेच शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



