रस्त्याची कामे निष्कृट दर्जाचे
शिवशाही वृत्तसेवा , फुलंब्री ( प्रतिनिधी तातेराव बनसोडे )
फुलंब्री तालुका येथील जातेगाव, चारमाणी, राजनगाव, गिर सावळी, बाभूळगाव रस्त्याची कामे निष्कृट दर्जाची झाली असल्याचा आरोप जिल्हा सचिव राम भाऊसाहेब गाडेकर यांनी केला आहे. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारास कळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची व कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने 2 जानेवारी पासून उपोषण सुरू करण्यात आले होते.
आज दिनांक 5 जानेवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे व पोलीस निरीक्षक सहाने यांच्या मध्यस्थी केली, आणि संबंधित उप विभागीय अभियंता फुलंब्री यांनी पाठवलेल्या पत्रात 15 जानेवारी पर्यंत कारवाई करण्यात येईल, आपण उपोषण सोडवावे अशी विनंती पत्राच्या माध्यमातून केली आहे.उपोषणकर्ते राम भाऊसाहेब गाडेकर यांचे उपोषण सोडण्यात आले आहे. इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



