रिपब्लिकन सेनेचा संमेलनाचा कार्याध्यक्षाना जाहीर पाठिंबा
शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा शहरामध्ये ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. परंतु, या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करून चळवळीशी बांधिलकी जपणाऱ्या संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना जाहीर पाठिंबा रिपब्लिकन सेनेने व्यक्त केला.
विचाराची लढाई विचारानेच लढली पाहिजे. या भूमिकेतून चांगला संदेश जावा. यासाठी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र नेते रमेश अनिल उबाळे यांनी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व शाल देऊन विनोद कुलकर्णी यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये उदंड प्रतिसाद लाभला आहे. या संमेलनाच्या माध्यमातून बहुजन समाजाला चांगल्या वैचारिक व सकस पुरोगामी विचाराची पेरणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ग्रंथ खरेदीची संधी मिळालेली आहे. विशेषता युगपुरुषांच्या विचाराला वाहिलेल्या अनेक ग्रंथाच्या खरेदीमुळे खऱ्या अर्थाने हा बहुजन महोत्सव झाला आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री विश्वास पाटील यांच्या व्यक्तिगत मताशी आम्ही सहमत नाही. किंबहुना याबाबत वैचारिक लढा आमचा सदैव राहणार आहे. परंतु, वढ्याच्या तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार हा निषेधार्थच आहे. संमेलनाचे कार्यध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी आंबेडकरी चळवळीला अनुकूल असे अनेकदा वृत्त प्रसिद्ध केलेले आहे. जाहीरपणे समतेची भूमिका घेतलेली आहे. हे नाकारून चालणार नाही.
त्यांच्याबद्दल सर्व समाजाला आदर आहे. हे दाखवून देण्यासाठी आज रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र नेते व अध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे, जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, महासचिव नितीन रोकडे, सातारा तालुका अध्यक्ष दीपक गाडे, महिला पदाधिकारी सुषमा धसके आणि ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप , अमित वाघमारे, गणेश काकडे धोंडीबा सप्रे, महिला जिल्हाध्यक्ष पद्मा सुतार व उपाध्यक्ष सुरेखा धोत्रे यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या व या संमेलनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांची ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने आभार मानण्यात आले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



