विद्यार्थ्यांनी एक तास मैदानावर घालवला तर,तो मोबाईल पासून दूर जाईल,असा संदेश
शिवशाही वृत्तसेवा कन्नड ( प्रतिनिधी मनोज चव्हाण )
कन्नड : राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त क्रीडा विभाग व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खेळाडू व स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या मातांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. शेखर पाटील, क्रीडा उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, " आज खेळाचे स्वरूप बदललेले आहे खेळातही करिअर करता येते खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार नोकरी मिळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळावर लक्ष केंद्रित करावे " तसेच मा. गोकुळ तांदळे, क्रीडा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी म्हटले की," विद्यार्थ्यांनी एक तास मैदानावर घालवला तर तो मोबाईल पासून दूर जाईल" या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय भोसले यांनी म्हटले की," विद्यार्थ्यांना खेळात व महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन देतात.
त्या विद्यार्थ्यांच्या माता त्यामुळे मातांचा सत्कार, गौरव होणे गरजेचे आहे " याप्रसंगी प्रभा पांचाळ, वंदना जगताप, सविता जाधव, सोनाली क्षीरसागर, शिलाबाई पवार, अशा कदम, सुनिता सोनवणे, वर्षा पहाटूळे, वैशाली वारेगावकर, विद्याबाई भोसले, मंगलबाई गंगावणे, अर्चना अकोलकर, आरती वाघ, सोनाली निळ, परविनबी पठाण, सविता राठोड, कल्पना घुगे, स्वाती शिरसे, हिना खान, सुनीता राऊत, सोनाली खंडागळे, मंगल बोंबले, वर्षा शिंदे, अरुणा दाभाडे इ. मांतांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाची क्रीडा प्रमुख डॉ. उदय डोंगरे यांनी केले यावेळी उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब मगर, एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रकाश महाजन, डॉ. राकेश अहिरराव, प्रा. अभय आहेर, तालुका क्रीडा संयोजक श्री मुक्तानंद गोस्वामी, श्री राहुल दनके, श्री श्याम खोसरे, श्री शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



