वाई निवडणूक यंत्रणा 'ॲक्शन मोड'मध्ये; १८१ केंद्रांवर १.३९ लाख मतदार बजावणार हक्क

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

Election, Satara, wai , shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )

सातारा जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या वाई तालुक्याची निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट आणि ८ पंचायत समिती गणांसाठीची अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार संख्या अचूक असल्याचे प्रमाणपत्र वाई तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशांनुसार, वाई तहसील प्रशासनाने संपूर्ण तालुक्यातील मतदार याद्यांची सखोल पडताळणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने १८१ मतदान केंद्रांची यादी आणि त्यामधील मतदारांच्या संख्येची वैयक्तिकरीत्या तपासणी करण्यात आली असून, यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून वाईचे प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी योगेश खरमाटे यांनी पत्रकार परिषद घेवून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी तहसीलदार, सोनाली मेटकरी, नाईब तहसीलदार वैभव पवार, गटविकास अधिकारी नारायण घोलप, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, पुढे बोलताना प्रांताधिकारी म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचावर्षिक निवडणुकीसाठी १६ जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र जमा करण्यास सुरुवात होणार असून २१ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अतिम तारीख आहे. २२ जानेवारीला अर्जाची छाननी करण्यात येणार आहे तर अर्ज मागे घेण्याची दि. २७ जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असून चिन्ह वाटपही त्याच दिवशी होणार आहे .२८ जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात होणार असून दि. ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला वाईच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

जिल्हा परिषद गट समाविष्ट गण यामध्ये एकूण मतदान केंद्रे १८१, एकूण मतदार संख्या १,३९,४३३ असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या खुल्या वर्गासाठी १ हजार, आरक्षित प्रवर्गासाठी ५०० रुपये तर पंचायत समितीच्या खुल्या वर्गासाठी ७०० आणि आरक्षित प्रवर्गासाठी ३५० रुपये अनामत रक्कम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच जिल्हा परिषद उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा साडे सात लाख रुपये आणि पंचायत समिती उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा सव्वा पाच लाख रुपये असेल, असे प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मतदार यादीत नाव असणे आणि केंद्रांची माहिती होणे अत्यंत गरजेचे असते. तहसीलदारांनी दिलेल्या 'हरकत नसल्याच्या' प्रमाणपत्रा मुळे आता कोणत्याही क्षणी निवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक आणि इतर तांत्रिक प्रक्रिया वेग घेणार आहेत.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह हे प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे. मतदार याद्यांच्या या अंतिम मंजुरीमुळे आता निवडणुकीच्या पुढील टप्प्यातील कामांना वेग येणार आहे. 'कंट्रोल चार्ट' नुसार सर्व आकडेवारी जुळत असल्याने प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेतील मोठा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला असल्याचे प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले.

होणारी निवडणूक ही पूर्णपणे कायदा व सुव्यवस्था राखून निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेचे पालन करून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले आहे.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !