बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलींचा नितीन तारकर साहेबच्या हस्ते सत्कार
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
इंदोर मध्य प्रदेश येथे पार पडलेल्या खेलो इंडिया वेस्ट झोन की बॉक्सिंग वुमन्स लीग स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील मुलींनी इतिहास रचला या स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या 84 मुलींमध्ये सातारा जिल्ह्यातील पाच मुलींची निवड झाली होती या किक बॉक्सिंग खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात तेलंगणा राज्यातून 500 हून अधिक मुलींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत महाराष्ट्राने 51 पथकाची कमाई केली यामध्ये महाराष्ट्राला 20 सुवर्ण पदक 17 रोपे पदक 14 कांस्यपदक पटकावले यामध्ये सातारच्या मुलींनी दोन सुवर्ण एक कास्य पदक पटकावले यामध्ये किसनवीर कॉलेज सना वजीर शेख सुवर्णपदक कन्याशाळा वाई, सई विठ्ठल धायगुडे सुवर्णपदक फलटण अंजली अमोल रोमन व गीतांजली जयराम बंडगर रोप्य पदक किसन किसनवीर कॉलेज कुमारी काजल निरज शर्मा कांस्यपदक पटकावले.
या मुलींची मार्चमध्ये चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया वुमन्स लीग किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली या मुलीं चा सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारकर साहेब यांनी सत्कार करून अभिनंदन केले तसेच ज्ञानदीपच्या प्रिन्सिपल शुभांगी पवार मॅडम सेम थॉमसचे रुपेश सिंग सर बाजार समिती संचालक तानाजी कचरे युवा नेते युवा उद्योजक विजयसिंह पिसाळ किसनवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे आणि सत्कार करून अभिनंदन केले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार सर सचिव धीरज वाघमारे सर सहसचिव विशाल सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली याबद्दल याबद्दल सातारा नगरीत विजेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव व सत्कार केला जात आहे. या स्पर्धकांना महाराष्ट् कोच ओमकार राठोड सर दिया गावडे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या अशाबद्दल सातारा किक बॉक्सिंग अंकुश जांभळे सर तेजस यादव सर सचिन लेंभे सर सफीय शेख मॅडम रविराज गाढवे सर वजीर शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिस करत आहेत व या मुलींना मार्गदर्शन लाभले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



