आमदार अभिजीत पाटील, युवक नेते भगीरथ भालके यांच्यासह तीर्थक्षेत्र आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींची उपस्थिती
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ येथे नगरसेविका सौ.माधुरी दिलीप धोत्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नवीन वर्षाच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले.
याप्रसंगी आमदार अभिजीत पाटील, विठ्ठल परिवाराचे नेते व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके, मनसे नेते दिलीप धोत्रे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे उपस्थित होते.
यावेळी पंढरपूर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगरसेवक व उमेदवार यांचा सन्मान मनसेच्या वतीने करण्यात आला.
नगरपालिका निवडणुकीदरम्यान मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रभागातील नागरिकांना दिलेले आश्वासन पूर्ण केले असून पंढरपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांनी विक्रमी मतांनी निवडून दिलेल्या नगरसेविका माधुरीताई दिलीप धोत्रे यांनी अवघ्या दहा दिवसातच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी जनसंपर्क कार्यालय नवीन वर्षाच्या मुहूर्तावर सुरू केले आहे. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले.
या जनसंपर्क कार्यालयाद्वारे प्रभागातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा असणाऱ्या रस्ते,वीज, पाणी, स्वच्छता व आरोग्याच्या समस्या नगरसेविका माधुरीताई दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून सोडवण्याचे काम केले जाणार असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



