व्यसनाच्या आहारी न जाता आई वडिलांची उत्तम सेवा करा
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी पारस मुथा)
फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन,पुणे तर्फे चर्होली बु.चे सामजिक कार्यकर्ते उद्योजक शशीकांत गुलाब बुर्डे यांचा सामाजिक कार्याबद्दल थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम ,शाल, श्रीफळ,सावित्रीबाई फुले ग्रंथ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र हभप.दत्तात्रय बुर्डे महाराज ,ह.भ.प. वाघेश्वर महाराज तळेकर आणि संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभ हस्ते देऊन गौरव करण्यात आला.यावेळी हभप.नितीन (नाना)ताम्हाणे ,कृष्णकुमार बुर्डे,नंदकुमार लडकत आळंदी नगर परिषद चे नगरसेवक संतोष रासकर उपस्थिती होते.
हा सोहळा श्री.संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात नविन वर्षाच्या प्रथम दिनी म्हणजे १ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता संपन्न झाला. या प्रसंगी शशिकांत बुर्डे यांनी चर्होली बु.च्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उस्तव समितीला थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे फायबर चे ३ पुटी अर्धपुतळे भेट दिले .
सत्कारास उत्तर देताना शशिकांत बुर्डे म्हणाले की आजच्या तरुण पिढीला महापूर्षांचे विचार कळू लागले असून या समिती ने गेल्या वर्षी मोठ्या दिमाखात सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले जयंती साजरी करून गुणवंतांचा सत्कार देखील केला होता. त्यांचे हे कार्य अखंड चालू रहावे नये आणि आज ची पिढी महापूर्षांचे कृतीशील विचाराने पुढे जात रहावी , समाजसेवा करत रहावी म्हणून त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी हे पुतळे भेट दिले आहेत. यापुढेही आम्ही मंडळी मदत करीत रहाणार आहोत. फक्त तरुण मुलांनी कोणत्याही नाहक व्यसनाच्या आहारी न जाता आई वडिलांची देखील उत्तम सेवा करावी असा मौलिक सल्ला पण दिला.
या वेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की बुर्डे साहेबांनी फुले दाम्पत्य यांचे पुतळे भेट दिले असून आता आपण फक्त जयंती पुण्यतिथी साजरी न करिता फुले दाम्पत्यांचे सत्यशोधक कार्य आत्मसात करून घरातील सर्व विधी भटजी विरहीत पार पाडण्यासाठी पुढे यावे. आमची संस्था मोफत पूर्ण सहकार्य करेल सोबत आपल्यातील कार्यकर्ते विधीकार म्हणून निर्माण करण्यास मदत करू. अंधश्रद्धा कर्मकांड यास तिलांजली दिल्याने भावी पिढीचे होणारे आर्थिक नुकसान देखील यामुळे टळणार आहे असे देखील ढोक म्हणाले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला ढोक यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड सर्वांकडून वदवून घेतला तर कार्यक्रमाचे आभार निलेश माटे यांनी मानले .यावेळी समस्त ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. याप्रसंगी वाघेस्वर महाराजाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



