साहित्यिकांच्या यज्ञकुंडात सातारकर चिंब चिंब नाहून गेले
शिवशाही वृत्तसेवा, सातारा
सातारा... सातारच्या ऐतिहासिक भूमीत ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोठ्या दिमाखात संपन्न झाले.साहित्यप्रेमींच्या अलोट गर्दीचा नवा उच्चांकच सातारच्या भूमीत प्रत्येकाला अनुभवायला मिळाला.संपूर्ण देशभरातून आलेले साहित्यिक मंडळी बरोबरच विदेशातून आलेल्या साहित्य प्रेमी मंडळींनी साताऱ्यातील अखिल भारतीय साहित्य संमेलनाची शोभा वाढवली.३२ वर्षानंतर सातारच्या भूमीला साहित्य संमेलन भरण्याविण्याची मिळवलेली परवानगी पाहता सातारच्या साहित्यिक मंडळींनी विशेषता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने घेतलेला पुढाकारामुळेच हे संमेलन साताऱ्यात घेणे शक्य झाले.
अर्थात यासाठी महाराष्ट्र शासन व साहित्य क्षेत्रात विशेष रुची असणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे लाभलेले पाठबळ तितकेच महत्त्वपूर्ण ठरले आहे.आज सातारा जिल्ह्यात अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे एक नवे चैतन्य निर्माण झाले आहे.हृदयाशी हृदयाशी नाते शब्दातून जोडणाऱ्या या साहित्यरुपी संस्कृतीतून मानवी जीवनाच्या प्रगतीचे व उत्कर्षाचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होतात.
म्हणूनच आजच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या युगात साहित्यरुपी ऊर्जा मानवाला नव्याने जगण्याची उमेद निर्माण करते, हेच तर खरे साहित्य रूपाचे खरे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच साहित्य संमेलने ही प्रत्येकाला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरते.ज्ञान मनोरंजन आणि कला-संस्कृतीचा अनोखा संगम साहित्य संमेलनातून अनुभवायला मिळतो.विविध साहित्यिकांची विचारधारा, संस्कृती याचे एक व्यासपीठ या निमित्ताने निर्माण होते.
सातारच्या ऐतिहासिक भूमीला तसा खूप मोठा साहित्यिक वारसा लाभलेला आहे.स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हेही एक राजकारणी असूनही मोठे साहित्यिक विचारांची बांधिलकी जपणारे एक नेतृत्व होते.सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र व मर्ढे गावच्या भूमिपुत्राने तर साहित्यिक क्षेत्राला संपूर्ण देशात नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.वाईतील मराठी विश्वकोश निर्मिती आणि कार्यालय यांचे योगदान सर्वांना परिचित आहेच.थोरामोठ्यांच्या आदर्श धारेवर चालणाऱ्या भारतीय संस्कृतीने संस्काररूपी ऊर्जा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये साहित्यिकांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
सातारकरांना साहित्य संमेलनाची अनुभूती अनुभवाला येत आहे.साताऱ्यात साहित्य संमेलनाचा जागर सर्वत्र आढळून येत आहे.ढोल ताशांच्या गजरात व चित्ररूपी रथाच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी साहित्य रुपी ऊर्जेचे प्रबोधन करणारे बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याला हे साहित्यरुपी नवचैतन्य निर्माण झाले आहे. साहित्य संमेलनातून मिळणारी ऊर्जा घेऊन अनेकजण आपापल्या क्षेत्रात नवी स्वप्न घेऊन जाणार आहेत.
भव्य-दिव्य व दिमाखदारपणे साजरे होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे संपूर्ण देशात सातारा जिल्ह्याची प्रतिमा उजळणार आहे.तसे पाहिले तर सातारा जिल्हा हा शूरवीरांचा, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला संतश्रेष्ठ रामदास स्वामी यांच्या वैचारिक भूमिका वारसा लाभला आहे.याच भूमीत शब्दांना भाले फुटतात तर तेथेच कवयित्री बहिणाबाई चौधरीच्या रूपाने संवेदनशील भावरुपी शब्दांचा ओलावा हि निर्माण होतो.शब्द गुंफनाचा हा सुरेख संगम सातारच्या साहित्य संमेलनामध्ये दिसून येत आहे.
मानवाच्या साहित्यकृती व संस्कृतीचे अनोखे संगम या निमित्ताने अनुभवायला येते.कवी,साहित्यिक, लेखक व वाचक या वर्गांसाठी हे साहित्य संमेलन नवी पर्वणीच ठरणार आहे.साहित्यप्रेमींचा उत्साह हा तर आता लग्नात मावेना इतका दिमाखदार सोहळा सातारच्या भूमीत रंगला आहे. १ ते ४ जानेवारीपर्यंत हे होणारे साहित्य संमेलन साहित्यिकांबरोबरच वाचकांनाही नवी ऊर्जा देणारे ठरणार आहे.शब्दगुंफनाचा एक रेशीम धागा या निमित्ताने निर्माण होत आहे.
साहित्यिकांना आपले साहित्य व विचारधारा थेट वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उत्तम माध्यम हे साहित्य संमेलन उपयुक्त ठरणार आहे.सातारच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे मराठी भाषा ही अधिक प्रभावीपणे संपूर्ण जगात जाण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त करून देणाऱ्या केंद्र सरकारनेही या भाषेचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. भाषा ही समाज जोडण्यासाठी व सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते आणि त्यासाठीच साहित्यिकांची भूमिका ही नेहमीच निर्णयाक ठरते.
नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणाऱ्या या संमेलनामुळे साहित्यिक क्षेत्रातील नव्या सामर्थ्यांची ओळख ही या निमित्ताने होत आहे.अर्थात हे संमेलन साताऱ्यात साकार करण्यासाठी अनेकांचे मौलिक साथ लाभत आहे.सरस्वतीच्या या यज्ञकुंडात शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग लागत आहे.भारतीय संस्कृतीचे अनोखे दर्शन या निमित्ताने अनुभवाला मिळत आहे.हे संमेलन म्हणजे विचारांचे व वैचारिकतेचे एक प्रेरणा स्त्रोत म्हणून चिरकाल साहित्यिकांच्या मनामनात राहणार आहे.
अनेक वर्षाचे अधुरी राहिलेले स्वप्न सातारच्या साहित्यिक प्रेमी विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या सहकार्याच्या जोरावर करून दाखवले हेही तितकेच सत्य आहे.नव्या पिढीला ऊर्जा देणारे, संस्कृती निर्माण करणारे, नवी पिढी या अखिल भारतीय साहित्य संमेलनातून प्रेरणा घेऊन भारतीय संस्कृतीचा अखंड वसा घेऊन पुढे वाटचाल करील याची खात्री वाटते.सातारच्या भूमीत,साहित्य संमेलनातून घडणारे संस्कार संपूर्ण देशाला नवी दिशा देण्यासाठी निश्चित कामी येणार आहे.ज्ञान-संस्कृती साहित्य-संस्कृती आणि विज्ञान-संस्कृती यांचा सुरेख संगम देशाला नवी दिशा देण्यासाठी अखेर साहित्य संमेलन हे पूरक ठरतात.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा


