मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित शिलेदारांचा गौरव

सातारा जिल्ह्यावर भाजपचा 'महाविजय'! 

Election, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )

सातारा जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या ऐतिहासिक यशाचा जल्लोष शुक्रवारी साताऱ्यात पाहायला मिळाला. नवनिर्वाचित ७ नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "सातारा जिल्ह्यात भाजपला मिळालेले हे यश जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाहीचा पाया आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आता नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींवर आहे."

कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आ. मदन भोसले, धैर्यशील कदम, सुरभी भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण सभागृह कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने आणि उत्साहाने दुमदुमून गेले होते.

या कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अमोल मोहिते (सातारा), अनिल सावंत (वाई), समशेरसिंह नाईक-निंबाळकर (फलटण), वैशाली माने (रहिमतपूर), पूजा विरकर (म्हसवड), रुपाली वारगडे (मेढा), तेजस सोनवले (मलकापूर) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच जिल्ह्यातील भाजपच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचाही सन्मान करण्यात आला. सत्कार स्वीकारल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष नेतृत्व आणि मतदारांचे आभार मानत शहरांच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

या सोहळ्यामुळे सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !