शेतकऱ्यांचा कारखान्याप्रती विश्वास वाढला
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
भुईज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाकडे गळित हंगाम सन २०२५-२६ मध्ये गळितास आलेल्या १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरअखेरचे ऊस बील प्रति मेट्रिक टन ३३५० रूपयाप्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेद्र रणवरे यानी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्याचे गाळप व उपप्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरू आहेत. मागील तीन हंगामामधील सर्व देय्यके दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कारखान्याप्रती विश्वास वाढलेला दिसून येत आहे. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबरअखेर किसन वीर कारखान्याकडे ५५ हजार ५२३ मेट्रिक टनाचे गाळप झालेले होते तर खंडाळा कारखान्याचे ३५ हजार ८०८ मेट्रिक टनाचे गाळप झालेले होते.
प्रति मेट्रिक टन ३३५० रूपयाप्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आलेली आहे. किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस हा दोन्हीं कारखान्यांकडे गाळपासाठी पाठविण्याबाबत कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी आवाहन केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



