2190 या कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद ७ गटासाठी व पंचायत समितीच्या १४ गणाच्या निवडणुकीच्या करिता उमेदवारी अर्ज स्वीकारणे शिरूर तहसील कार्यालय येथे सुरू झाले असून हे अर्ज ऑफलाइन स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले असून निवडणूक काळामध्ये उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे ही त्यांनी सांगितले आहे
शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद ७ गटासाठी 37 उमेदवारी अर्ज तर पंचायत समिती १४ गणांसाठी 120 उमेदवारी अर्ज विक्री झाले असल्याचे सांगून अद्याप पर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारी अर्ज 16 जानेवारी ते 21 जानेवारी या पर्यंत शिरूर तहसील कार्यालय येथील तहसीलदार यांच्या दालनामध्ये स्वीकारले जाणार आहेत. तर 22 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता या अर्जांची छाननी होणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 23 जानेवारी ते 27 जानेवारी हा कार्यकाल असून त्यानंतर दुपारी साडेतीन नंतर उमेदवारी साठी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी एकूण 337 मतदान केंद्र असणार आहे तर यामध्ये कुठेही संवेदनशील किंवा अति संवेदनशील मतदान केंद्र नाहीत. या मतदान केंद्रासाठी एकूण 438 केंद्राध्यक्षांची नेमणूक केली आहे. मतदान अधिकारी निवडणूक समन्वय अधिकारी म्हणून 24 जणांची नेमणूक केलेली आहे तर,1314 मतदान अधिकारी तर 438 शिपाई म्हणून नेमणूक करण्यात आली असून एकूण 2190 कर्मचारी या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी ईव्हीएम स्टॉक रूम ही राज्यवकार महामंडळ रांजणगाव एमआयडीसी कारेगाव गोडाऊन नंबर 2 येथे तर मतमोजणी राज्य वखार महामंडळ रांजणगाव एमआयडीसी कारेगाव गोडाऊन नंबर तीन येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी पोलीस खाते ह सतर्क झाले असून रांजणगाव पोलीस स्टेशन येथे 35 जणांवर तर शिरूर पोलीस स्टेशन येथे पन्नास जणांवर, शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 36 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तीन प्रशिक्षण होणार आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



