मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिजाऊ सृष्टीवर लाखो महिलांना मोफत जेवणाची व्यवस्था
सिंदखेडराजा येथे माजी मंत्री व आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनी गेल्या सात वर्षांपासून जिजाऊ भक्तांसाठी निस्वार्थ भावनेने अखंड सेवा सुरू ठेवली असून यावर्षी देखिल लाखो महिलांना जिजाऊ सृष्टीवर मोफत जेवणाची व्यवस्था मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे पाटील यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
दरवर्षी 11 जानेवारी रोजी महाराष्ट्रभरातून जिजाऊ ब्रिगेडच्या मशाली घेऊन येणाऱ्या लाखो महिला भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येते. तसेच 12 जानेवारी रोजी पहाटे चार वाजल्यापासून चहा, पाणी व नाश्त्याचे दोन स्टॉल सुरू ठेवले जातात. यापैकी एक स्टॉल राजवाड्यासमोर तर दुसरा जिजाऊ सृष्टी येथे असतो. ही संपूर्ण सेवा निस्वार्थ भावनेतून केली जाते, असे डोंगरे पाटील दल यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलनात आत्महत्या केलेल्या शंभर कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली असून, काही कुटुंबांतील मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. तसेच अडचणीत सापडलेल्या मराठा चळवळीतील तरुणांनाही मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय 6 जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त येणाऱ्या शिवभक्तांसाठी चहा व नाश्त्याचे वाटपही केले जाते.
सिंदखेडराजा येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत तानी तात्काळ 100 बेडचे रुग्णालय उभारून त्यास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला, हे विशेष मोफत अन्नदान साठी अशोक राजे जाधव, निलेश देवरे, बाळासाहेब पाथरकर, गोविंद टिके, बाळासाहेब शेळके, संजय उगले, दीपक किंगरे, अतिश राजे, शंकर शिंदे, दिगंबर शिंदे, निलेश देशमुख, देवडे पाटील, बाबासाहेब पुरंदरे, विठ्ठल चव्हाण, श्याम राठोड हे परिश्रम घेत आहे
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



