पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवशाही वृत्तसेवा, पुणे ( प्रतिनिधी पारस मुथा )
कोंढवा–येवलेवाडी प्रभाग क्रमांक 40 मधील शिवसेनेच्या उमेदवार संगीताताई ठोसर यांची आज येवलेवाडी परिसरात जोरदार पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवसेनेच्या घोषणा देत ही पदयात्रा परिसरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली.
या पदयात्रेत शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घराघरांत जाऊन संगीताताई ठोसर यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत “पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, महिला सुरक्षा आणि युवकांसाठी संधी” या मुद्द्यांवर काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बोलताना संगीताताई ठोसर म्हणाल्या की, “येवलेवाडी आणि कोंढवा परिसराचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून मी सातत्याने संघर्ष करेन.”
पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत स्वागत केले. अनेक ठिकाणी स्थानिक महिलांनी आरती करून संगीताताईंना शुभेच्छा दिल्या. एकूणच ही पदयात्रा म्हणजे शिवसेनेची ताकद दाखवणारी आणि प्रचाराला अधिक गती देणारी ठरली. यावेळेस येवलेवाडीतील ग्रामस्थांनी या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
दशरथ काळभोर, मा. जि. प.सदस्य दादासाहेब कामठे,उपसरपंच कामठे,उपसरपंच रामदास कामठे, बाळासाहेब शेलार अमोल निंबाळकर, अभिजीत कामटे, बाळासाहेब शिंदे, अशोक झाडे हर्षद इंगवले, सचिन बापू निंबाळकर समीर कामठे व संजय शेंडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



