चोरीस गेलेला मुद्देमाल शिताफिने पोलिसांच्या ताब्यात
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई बसस्थानकावरुन चोरीस गेलेले १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकुण १ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज व आरोपी वाई पोलीसांनी शिताफिने ताब्यात घेतला. एका दिवसातच चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार दी. ९ रोजी फिर्यादी ताराबाई पिसाळ रा. बावधन या सकाळी ११.३० च्या सुमारास मांढरदेव येथे देवदर्शनासाठी जाण्याकरीता वाई एसटी स्टॅण्ड येथे आल्या होत्या वाई एसटी स्टॅण्ड येथील फलाट क्र १० वर वाई मांढरदेव एसटी मध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांचे गळ्यातील १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हे ओढुन चोरी केल्याचे लक्षात आले. तसेच भारती भिकन खुडे यांची पर्स चोरीस गेल्याचे समजले सदरचे पर्समध्ये ९००० रुपये रोख रक्कम होती. सदरबाबत वाई पोलीस ठाणे
येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे यांनी गुन्हेप्रकटीकरण शाखा वाई यांना दिल्या त्यानुसार वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे यांनी आरोपीचा वाई बसस्थानक येथे कसुन शोध
घेतला असता एक संशयित इसम हा पोलीसांना पाहुन पळुन जात असतांना त्याचा पाठलाग करुन पकडुन त्याचे नाव विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याचेवर वाजवी संशय आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचेकडे नमुद चोरीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव अशोक मधुकर जाधव रा. कणकवली जि.सिंधुदुर्ग असे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाई पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहा.पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.कॉ विक्रम धोत्रे, विशाल शिंदे, पो.कॉ नितीन कदम,पो.कॉ हेमंत शिंदे, पो.कॉ श्रावण
राठोड यांच्या पथकाने सदर कारवाई केली. पुढील तपास पोलीस हवालदार सपकाळ करीत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



