विरबॅक ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची कौतुकास्पद कामगिरी
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुजर प्रशालेस विरबॅक ॲनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सि एस आर फंडातून शंभर बेंचेस वितरण मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्या सहकारी बँकेचे संचालक, महेशबापू ढमढेरे व शिरूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सुजित शेलार यांच्या विशेष प्रयत्नातून हे बेंचेस प्रशालेला प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंददादा ढमढेरे होते. यावेळी डॉ, सुजित शेलार,विजय कुंभार, तळेगाव ढमढेरेचे पशुवैद्यकीय अधिकारी राजेंद्र त्रंबके,बाबासाहेब वर्पे, संतोष खांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
विरबॅक कंपनी यांनी मुलांच्या बैठीकीची गरज ओळखून सी एस आर फंडातून जे शंभर बेंचेस दिले त्याचे कौतुक अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे मानद सचिव अरविंदादादा ढमढेरे यांनी केले.
यावेळी विरबॅक कंपनीचे श्री विजयकुमार कुंभार रिजनल बिझनेस मॅनेजर महाराष्ट्र,श्री नितीन पवार, एरिया बिझनेस मॅनेजर पुणे जिल्हा,संतोष खांडेकर ,बिझनेस ऑफिसर पुणे,कल्याण चंदनशिवे,बिझनेस ऑफिसर केडगाव,कैलास काळगावे,बिझनेस ऑफिसर शिक्रापूर,बाबासाहेब वर्पे ,रिजनल बिझनेस मॅनेजर महाराष्ट्र,
गौरव खैरनार तसेच चंद्रशेखर दातखिळे, सचिन पंडित साहेबराव शंकरराव ढमढेरे कला, वाणिज्य महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी, प्रशालेचे प्राचार्य अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा परदेशीं व आभार मोहन ओमासे यांनी मानले.
या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंदादादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, जेष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



