युवकाचा शॉट लागून मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा ,वैजापूर ( प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी )
वैजापूरच्या महावितरणच्या सिटी सर्वे ऑफिस जवळ आज सोमनाथ आश्रम पांडघळे वय 29 वर्ष रा. आघुर ता. वैजापूर या युवकाचा शॉट लागून मृत्यू झाला.
सविस्तर माहिती अशी कि, सोमनाथ पांडगळे हे आठ वर्षापासून लाईनमनच्या हाताखाली काम करत होते.
भूमी अभिलेख कार्यालयाजवळ विद्युत तारेचे काम करत असताना अचानक तारेमध्ये विद्युत प्रवाह आल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला.
यावेळी महावितरणचे कर्मचारी व नागरिकांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहे. पांडगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्तुत्ववान तरुणावर काळाने घाला घातल्यामुळे आघुरगाव पूर्णतः दुःखमय झाले आहे .
निष्काळजीपणामुळे तालुक्यातील हा दुसरा बळी आहे.
नंतर नातेवाईकांनी महावितरण वर गुन्हा दाखल झाला पाहिजे अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, परमिट असताना तारेमध्ये विद्युत प्रवाह आला कसा याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी निलंबित करण्यात यावे अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी महावितरण कार्यालयासमोर केली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



