संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आणि स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले झाले पालखीचे भोई
साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने महाराष्ट्र राज्याची संस्कृती परंपरा संत वाङ्ममय आणि साहित्य यांच्या आठवणी निश्चितपणे जागवल्या. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्यध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष शरद बेबले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्रीफळ वाढवून ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात आले.
राजवाडा येथून ग्रंथ दिंडीची सुरुवात झाली. या ग्रंथ दिंडीला स्वतः शिवेंद्रसिंहराजे भोसले मिलिंद जोशी यांनी खांदा दिला. सातारा शहरातून या ग्रंथदिंडी राजपथ ते पोवई नाका तेथून पोलीस कवायत मैदान मार्गे श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्य नगरी कडे मार्गस्थ झाली . तत्पूर्वी स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील,अखिल भारतीय मराठी महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांची चांदीच्या रथातून मिरवणूक काढण्यात आली .
या ग्रंथदिंडीमध्ये ५५ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते .पर्यावरण, साताऱ्यातील पर्यटन, संत साहित्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाज सुधारक महात्मा फुले यांची शिक्षण चळवळ,सं त ज्ञानेश्वर, मुक्ताबाई यांनी केलेला संतपरंपरेचा प्रसार अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्र सादर केले.
----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



