महिला जिल्हाध्यक्षपदी नीता देव तर उपाध्यक्षपदी गणेश शिंदे
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
राज्यातील डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया अशा सर्व पत्रकारांसाठी काम करणारी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारणी बैठक पंढरपुरात पार पडली. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक मुरलीधर चव्हाण राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले राज्य प्रसिद्धीप्रमुख धीरज शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये प्रवीण नागणे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी तर नागेश सुतार यांचे राज्य तांत्रिक सल्लागारपदी निवड करण्यात आली. त्याचबरोबर सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सचिन कुलकर्णी, उपाध्यक्षपदी गणेश शिंदे, जिल्हा संघटक तानाजी जाधव, जिल्हा सहसचिव किरण माने, तर नीता देव यांची सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अशा राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंढरपूर शहर अध्यक्ष सोहन जयस्वाल, पंढरपूर तालुका अध्यक्ष नामदेव लकडे, पंढरपूर तालुका सचिव अजित देशपांडे, माढा तालुकाध्यक्ष विजय चव्हाण, करमाळा तालुका अध्यक्ष दिनेश मडके, बार्शी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत, यांना निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
"सध्या डिजिटल युग असून डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना राजमान्यता मिळवून देण्यासाठी आपली संघटना काम करत असून प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून पत्रकारांच्या मुला मुलींना शैक्षणिक व कुटुंबाला वैद्यकीय कारणासाठी आपण आर्थिक मदतही करत आहोत. डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणून राज मान्यता मिळवण्यासाठी देखील संघटना प्रयत्न करत आहे आणि लवकरच त्यात यश मिळेल" असे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोहन जैस्वाल, सूत्रसंचालन प्रवीण नागणे यांनी केले, तर सूर्याजी भोसले यांनी शेवटी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित होत्या.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



