निराधार व उघड्यावर रात्र काढणाऱ्या नागरिकांना मोफत ऊबदार ब्लॅन्केटचे वाटप
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी प्रविण शिशुपाल सोशल फाउंडेशनच्या वतीने “मायेची ऊब” या मानवतावादी उपक्रमांअंतर्गत दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी शिरूर शहरातील विविध ठिकाणी गरीब, गरजू, निराधार व उघड्यावर रात्र काढणाऱ्या नागरिकांना मोफत ऊबदार ब्लॅन्केटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत शिरूर एस.टी. स्टँड परिसर, सतरा कमानी पुलालगतची भील वस्ती, सम्यक बुद्ध विहार, सिद्धार्थ नगर, तसेच पाबळ फाट्यावरील उघड्यावर रात्र घालवणारे गरजू नागरिक यांना थंडीपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने ब्लॅन्केटचे वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमात कार्याध्यक्षा मा. मधुताई शिशुपाल, अध्यक्ष मा. पैलवान संतोष गव्हाणे, उपाध्यक्ष मा. नाथाभाऊ पाचर्णे , सचिव मा. फिरोज भाई सय्यद, कोषाध्यक्ष मा. युवराज सोनार, सह कोषाध्यक्ष मा. प्रशांत शिशुपाल, तसेच कायदे सल्लागार अॅड. स्वप्नील किशोर माळवे व अॅड. गोरखनाथ वेताळ सर, मा. अविनाश देशमुख, मा. सतेश सरोदे आणि सागर घोलप यांच्यासह फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कडकडीत थंडीत ऊबदार ब्लॅन्केट अंगावर घेताच गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे स्मित व त्यांनी दिलेले मनापासूनचे आशीर्वाद हे या उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
महत्वाचे म्हणजे, “मायेची ऊब” हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून, आगामी दिवसांतही शिरूर शहर व परिसरातील गरजू, बेघर व निराधार नागरिकांना ऊबदार ब्लॅन्केटचे वाटप सातत्याने करण्यात येणार आहे, असे फाउंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
समाजातील वंचित घटकांसाठी अशा मानवतावादी उपक्रमांची मालिका पुढेही अखंडपणे सुरू राहील, असा संकल्प यावेळी फाउंडेशनने व्यक्त केला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










