रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये गंभीर व गैरप्रकार
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारल्याने सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचारणे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे. शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार नाकारून बळजबरीने हजारो रुपये आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार शिरूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे व पत्रकार अमोल बोरगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.जखमी रुग्णांना शिरूर येथील रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाउंडेशन संचलित मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल तसेच संलग्न ग्रँट मेडिकल फाउंडेशन – रुबी हॉल क्लिनिक, शिरूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते
विशेष म्हणजे, संबंधित कुटुंबाकडे आयुष्यमान भारत कार्ड तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही “कार्ड चालत नाही” व “या कार्डावर उपचार होणार नाहीत” असे सांगून मोफत उपचार नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले. याशिवाय बिलातील काही रक्कम रोख स्वरूपात वसूल करण्यात आले होते
सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य प्रशासक मायकेल पॉल यांनी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांच्याशी अरेरावीची भाषा वापरल्याचा तसेच धक्काबुक्की केल्याचा प्रकार करण्यात आला. त्यामुळे हॉस्पिटल मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनालाही पाचारण करण्यात आले होते.
या घटनेमुळे शासकीय आरोग्य योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती ढिसाळ आहे, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



