नुतन नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा कामाचा धडाका
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
नगराध्यक्ष अनिल सावंत व प्रभाग क्रमांक ७ च्या तरुण, तडफदार नगरसेविका केतकी पाटणे यांनी पदभार स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष विकासकामास सुरुवात केली आहे.
नुकताच पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्ष अनिल सावंत व नगरसेविका केतकी पाटणे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक सातमधील भगवा कट्टा परिसरात बंदिस्त गटर कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून श्रीगणेश करण्यात आला.
येत्या पाच वर्षांत प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण, बंदिस्त गटार योजना यांना प्राधान्य देऊन प्रभाग क्रमांक सात हा नागरिकांच्या तक्रारमुक्त करण्याचा मानस नगरसेविका केतकी पाटणे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासकामाच्या शुभारंभाबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी नवप्रकाश मंडळाचे अध्यक्ष दिलीप शिवदे, वझे काका, काशिनाथ शेलार, अनिल गोळे, नरहरी महाबळेश्वर गुरुजी, अमर सुतार, आशिष पाटणे, गंगाराम सकुंडे, मधुकर सकुंडे, अमित देशमाने, अॅड. सायली सकुंडे, सुदर्शन चव्हाण, अनिकेत चव्हाण, संतोष पोफळे, वेदमूर्ती महाबळेश्वरकर गुरुजी, सुनील गोळे, प्रशांत चिटणीस, रमेश बेलोशे, दिलीप बेलोशे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी नगराध्यक्ष अनिल सावंत व नगरसेविका सौ. केतकी पाटणे यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी नगराध्यक्ष श्री. अनिल सावंत, शहराध्यक्ष विजय ढेकाणे, कुलदीप शिंदे तसेच पाटणे कुटुंबीयांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



