नागरिकांना सुरक्षित व आरामदायक प्रवासाचा दिलासा
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहराला जोडणारा व परिसरातील सर्वाधिक रहदारी असलेला वाई–बावधन–कणूर–दरेवाडी हा महत्त्वाचा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत खराब अवस्थेत गेला होता. त्यामुळे बावधन परिसरातील वाडी-वस्तीवरील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. ही गंभीर बाब बावधनचे युवा नेते प्रणित पाटील यांनी वाई तालुक्याचे आमदार तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.
या तक्रारीची तातडीने दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांनी संबंधित विभागाला प्रत्यक्ष पाहणीचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर त्यांनी सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २२ लाख रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला.
मंजूर निधीतून वाई–बावधन–कणूर–दरेवाडी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास आज बावधन व दरेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित व आरामदायक प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार आहे.
युवा नेते प्रणित पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या कामाच्या प्रारंभप्रसंगी किसनवीर कारखान्याचे संचालक दिलीप बाबा पिसाळ, माजी उपसभापती मदन भोसले, बावधन गावचे उपसरपंच उदयसिंह पिसाळ, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अजित पिसाळ-पाटील, बाजार समितीचे संचालक अंकुश कुंभार यांच्यासह विश्वास पिसाळ, विक्रम पिसाळ-पाटील, विक्रम वाघ, माजी सरपंच सतीश कांबळे, बाळासाहेब भोसले, पप्पू राजे भोसले, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कांबळे, मदन ननवरे, सुशील घोलप, नितीन मांढरे, भानुदास साळुंखे, नाना पिसाळ-पाटील, समाधान कदम, मंगेश अनपट, राजेंद्र दाभाडे, धनंजय पिसाळ, बाळासाहेब शिंदे, पोपट भोसले, नारायण शिंदे, सुरेश शिंदे, किशोर भोसले, महेश भोसले, मनोज नाईकवडी, प्रणित पिसाळ-पाटील, नंदकुमार भोसले, अजित भोसले, गणेश भोसले, अभिजीत ननावरे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



