दुर्दैवी घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा, राहुरी (प्रतिनिधी गोविंद आढाव)
राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात आज दि. २७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे लाईनवरुन मोबाईलवर बोलत जात असलेल्या ४६ वर्षीय इसमाला रेल्वेची जोरदार धडक बसून तो जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.
राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण, वय ४६ वर्षे हे आज दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजे दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे लाईनवरून जात असताना मोबाईल फोनवर बोलत होते. याच वेळी त्यांच्या पाठीमागुन गोवा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी भरधाव वेगात आली. दत्तात्रय चव्हाण हे मोबाईल फोनवर बोलत असल्याने त्यांना पाठीमागुन आलेल्या रेल्वेचा अंदाज आला नाही. यावेळी त्यांना रेल्वेगाडीची जोरदार धडक बसली. या घटनेत दत्तात्रय चव्हाण यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन रेल्वे लाईनवर पसरले होते. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. तर घटनास्थळी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. प्रसंगी सरपंच विराज धसाळ यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जयदीप बडे, चाँद पठाण, योगेश आव्हाड आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे तांदूळवाडी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



