सेतूबंध प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

श्री क्षेत्र पंढरीत होणार साहित्यिकांचा गौरव
Sahitya puraskar, literature award, Maharashtra, Marathi, pandharpur, Solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
सेतूबंध प्रतिष्ठान या फिरत्या वाचन चळवळीच्या वतीने साहित्य व साहित्यिकांना आणि त्यांच्या लेखणीला प्रेरणा देण्यासाठी कथा, कविता, कादंबरी, संत साहित्य संशोधन, गझल, बालकविता संग्रह, संशोधित ग्रंथ अशा सर्व प्रकारांतील साहित्य मागविण्यात येत आहे. प्राप्त साहित्यकृतींपैकी कोणत्याही उत्कृष्ट तीन साहित्यकृतीना पुरस्कृत करण्यात येईल.

साहित्यिकांनी 2025 या वर्षात प्रकाशित झालेले साहित्य पुरस्कारासाठी दोन प्रतीत पाठवावे. प्रस्ताव पाठवताना सोबत २ साहित्यकृती आणि अल्प परिचय पाठवावा. पुस्तके पाठवल्यानंतर वारंवार विचारणा करू नये. तसे दिसून आल्यास संबंधित प्रस्ताव रद्द होईल. प्रस्ताव 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत पाठवू शकता. पुरस्कार वितरण सोहळा किंवा इतर माहिती सोशल मीडियावरून वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल. ऐनवेळी काही आवश्यक बदलाचे अधिकार सेतुबंध प्रतिष्ठान समितीकडे आहेत याची नोंद घ्यावी. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

आपले प्रस्ताव खालील पत्त्यावर पाठवावेत.
सूर्याजी हरी भोसले
मु.पो. पुळुज ता. पंढरपूर
जि. सोलापूर पि. ४१३३०४
मो. ९५२७३५६२३२
कृपया ही बातमी आपल्या साहित्यिक मित्रांना शेअर करावी असे आवाहन सहयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !