हिंदू जनजागृती समितीचे वाई तहसीलदारांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा तातडीने मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी वाई येथील तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने समितीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
निवेदनात, 'लव्ह जिहाद'मुळे महिला आणि मुलींचे होणारे धर्मांतरण आणि छळ थांबवण्यासाठी कठोर कायद्याची नितांत गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने या गंभीर समस्येची दखल घेऊन तत्काळ पाऊले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सेवक, धर्मप्रेमी, तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी तहसीलदार यांना मागणीचे निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये, केवळ 'लव्ह जिहाद'च नव्हे तर 'धर्मांतरण विरोधी' कायदाही कठोर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या कायद्यामुळे महिलांचे संरक्षण होईल आणि समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














