वाईमध्ये 'विश्वरूप संगीत महोत्सव' उत्साहात
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
जगप्रसिद्ध पखवाज वादक प. वसंतराव धारपडकर गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाई येथे 'विश्वरूप संगीत महोत्सव' मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. गानगंगा नगरी वाईतील कलाप्रेमी रसिकांनी या मैफलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवाचे आयोजन वाईच्या पश्चिम भागात वारकरी संप्रदयाचा वारसा जपणाऱ्या 'विश्वरूप वारकरी शिक्षण संस्था, रेणावळे' यांच्या वतीने संस्थापक सुहासजी गवळी यांनी केले होते. तसेच अशोक आबा मांढरे (अभेपुरी), रोहित वाडकर (चिखली) आणि ज्ञानदेव सणस यांनी विशेष सहाय्य करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे मोलाचे कार्य केले.
या संगीत महोत्सवात अनेक तरुण आणि अनुभवी कलाकारांनी आपली कला सादर करून गुरुजींना आदरांजली वाहिली. कार्यक्रमात तबला वादन सुहासजी गवळी तसेच सुहासजी गवळीयांचे शिष्य धनराज जगदाळे, श्रीहरी लवे, आरुष क्षीरसागर, सार्थक चिकणे, वेदांत झांबरे, श्रीनेश कुमार, साई सुतार, गणेश घनावडे, शंभू कोळकेकर, मोहित कदम. तबला-पखावज विनायक पाटील, चेतन्य मेटगळ, शुभम शिंदे, अनिकेत जाधव, अनिकेत निंबाळकर, ज्ञानेश्वर मिसाळ. रुद्र ताल वादन: ज्ञानराज शिंदे, सौरभ कांगणे तर धमार ताल वादन गोरख जाधव यांनी केले.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण होते पखवाजचे एकलवादन. प. संदिपजी जाधव शिष्य सुहासजी गवळी यांनी आपल्या पखवाज वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना अंकित कुंभार (हार्मोनियम) आणि सौ. प्रिया जाधव, सौरभ कांगणे यांनी सुरेख साथ दिली.
संगीत महोत्सवामुळे वाईच्या सांस्कृतिक परंपरेत एक नवा अध्याय जोडला गेला. सर्व कलाकारांच्या दमदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली आणि प. वसंतराव घोरपडकर गुरुजींच्या स्मृतींना संगीतमय आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी अशोक आबा मांढरे (अभेपुरी), रोहित वाडकर (चिखली) आणि ज्ञानदेव सणस यांनी वाईच्या पश्चिम भागातील वारकरी संप्रदायाचा वारसा जपण्याचे आश्वासन देत पुढील काळात यासाठी भरीव प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














