शेंदुरजणे मध्ये हिंदू–मुस्लिम ऐक्याचा अनोखा आदर्श!
शिवशाही वृत्तसेवा, वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शेंदुरजणे गावात नुकताच ४८ वर्षांचा पारंपरिक ज्ञानेश्वरी ग्रंथपारायण सोहळा अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. या सोहळ्याला यंदा एका ऐतिहासिक घटनेची जोड मिळाली, ज्यामुळे गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एक तेजस्वी आदर्श महाराष्ट्रासमोर उभा राहिला आहे. यावर्षी प्रथमच गावातील संपूर्ण मुस्लिम समाजाने या ग्रंथपारायणाच्या समारोपाच्या दिवशी, म्हणजेच काल्याच्या निमित्ताने, महाप्रसादाचे आयोजन केले.
सुमारे २,५०० ते ३,००० लोकांसाठी मुस्लिम बांधवांनी महाप्रसाद तयार करून आलेल्या सर्व भाविकांचे मन जिंकले. गेल्या तीन वर्षांपासून मुस्लिम समाजाकडून या काल्याच्या महाप्रसादात सहभागी होण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली जात होती. अखेर यावर्षी त्यांची ही इच्छा पूर्ण झाली आणि त्यांनी या कार्यात सक्रीय सहभाग घेतला. धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यात शेंदुरजणे येथील मुस्लिम समाज नेहमीच उत्साहाने सहभागी होत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














