दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी प्रहार
शिवशाही वृत्तसेवा, राहुरी ( प्रतिनिधी गोविंद आढाव )
माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सह अहिल्यानगर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी पंकज आशियासाहेब यांना शासन निर्णयानुसार आमदार, खासदार फंडातून 5 टक्के निधी नियमित खर्च करण्यात यावा.दिव्यांग बांधवांचा सरसकट घरकुलचा ला मिळावा . काही सध्या दिव्यांग बांधवांना 1500 रुपये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो सर्व दिव्यांग बांधवांना 2500 संजय गांधी चा लाभ मिळाला पाहिजे शासन निर्णयानुसार पालकमंत्री जिल्हाधिकारी आमदार खासदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका स्तरावर समित्या तात्काळ गठित करण्यात यावा जिल्हा नियोजन समितीतील 1% निधी दिव्यांगावर खर्च करण्यात यावा अशा अनेक मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचेराज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे साहेब जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पोपट शेळके जिल्हा संघटक मूकबधिर संघटनेचा जिल्हाध्यक्ष दीपक जाधव मूकबधिर संघटनेचे तालुकाध्यक्ष वेनुनाथ आहेर जिल्हा संघटक संजय पुंड, भरत ढेरंगे, संगमनेर तालुकाध्यक्ष गणेश शेळके पठार भाग अध्यक्ष संभाजी काळे सौ पोर्णिमा आढाव नगरशहर अध्यक्ष संदेश रपडिया ,जगताप मॅडम श्रीगोंदा तालुका अध्यक्ष सुरेश गलांडे ,राहुरी येथील तालुका संघटक नानासाहेब खपके भरत आढाव, पाराजी भोसले पाटील दर्शनलाल विजन चंद्रकांत पानसबळ संदेश रपडिया दत्तात्रय तनपुरे जगताप मॅडम उर्मिला कोकडे जेऊर शाखाध्यक्ष तोहसीफ शेख अमोल अलकुटेउपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














