वाई नगरपरिषद आणि पोलिसांच्या डोळ्यांदेखत नियम चिरीमिरी मुळे पायदळी
शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे)
काही दिवसांपूर्वीच शिवशाही न्यूज आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये वाई शहरातील श्री महागणपती मंदिराला जोडून असणाऱ्या महत्त्वाच्या पुलावरील दुतर्फा असलेल्या अनधिकृत दुकानांच्या विळख्याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. शहरातील वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या, तसेच सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणाऱ्या या बेकायदेशीर दुकानदारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना, वाई नगरपरिषद आणि वाई पोलीस प्रशासनाने या बातमीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे विदारक चित्र आहे. चिरीमिरी च्या विळख्यात अडकलेले नगरपरिषदेचे काही भ्रष्ट अधिकारी आणी अनागोंदी कारभारामुळे वाई शहर या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे हे वास्तव सागांयला कुठल्याही जोतीश्याची गरज नाही. हे गेंड्याची कातडी पांघरूण हाताची घडी तोंडावर बोट ठेवणारे चिरीमीरी बहाद्दर अधिकारी हे पाठिशी उभे असल्याने या फेरीवाल्यांचे फावले असल्याचे दबक्या आवाजात वाई शहरात चर्चा चालू आहे त्यामुळे भविष्यात येणारा काळच सांगेल की हे अतिक्रमण हटणार की नाही आणि पोलिसांची ही हाताची घडी तोंडावर बोट अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे यांच्यातील ही काही बहाद्दर चिरीमिरीच्या विळख्यात अडकलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणा वरून येणारी चिरीमिरी त्यामुळे हे साहेब काय त्या ठिकाणी जाऊन अतिक्रमण काढायला मागत नाहीत. त्यामुळे वाई शहर या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेले पाहायला मिळत आहे हे वास्तव मानलं असता काही जणांना नवल वाटायला नको. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून शिवशाही न्यूज ने निर्भीड निपक्ष पत्रकारितेचे उदाहरण निर्माण करून याविरुद्ध बातमी प्रसिद्ध केली. हे आजच्या घडीला खूप महत्त्वाचे आहे नाहीतर या वाई शहराचा शंभर टक्के बाजार होणार ही काळ्दया दगडावरची पांढरी रेघ आहे
वृत्त प्रसिद्ध होऊनही, आजतागायत या अनधिकृत दुकानांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या दुकानांची 'जैसे थे' स्थिती कायम असून, येथील विक्रेत्यांचा रस्त्यावरचा पसारा तसूभरही कमी झालेला नाही. याचा थेट अर्थ असा होतो की, स्थानिक प्रशासनाला मग ती नगरपरिषद असो वा पोलीस येथील वाहतूक कोंडी किंवा सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण, याबद्दल काडीचीही घेणे देणे नाही. त्यामुळे भविष्यात जनतेने विचार करून या प्रशासनाचा निषेध करावा
हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नसून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आहे परंतु कार्यक्षमता ही चिरीमिरी मध्ये घाण ठेवली आहे त्यामुळे भविष्यात राजकीय इच्छाशक्तीचा हि आहे. भविष्यात जनतेला प्रश्न पडला आहे की, वृत्तपत्रात पुरावे देऊनही कारवाई होत नसेल, तर हे अनधिकृत धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत? नगरपरिषद या अनधिकृत अतिक्रमणाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे का?वाहतुकीला अडथळा होत असतानाही पोलीस प्रशासन चिरीमिरीच्या विळख्यात अडकल्यामुळे मूग गिळून गप्प आहे का असा सवाल नागरिक करत आहेत.
या पुलावरचा बेशिस्त कारभार रोजचा होत चालला आहे. वाईचे सौंदर्य बिघडवणाऱ्या वाई पोलीसानी वाहतूक व्यवस्था कोलमडणाऱ्या अधिकारी यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे व सामान्य नागरिकांचे हाल करणाऱ्या या प्रकाराला तात्काळ पायबंद घालायलाच हवा. अन्यथा, 'प्रशासन केवळ मोठ्या माशांना हात लावत नाही,' असा स्पष्ट संदेश जनतेत जाईल आणि भविष्यात या निष्क्रियतेचे परिणाम गंभीर असतील!
वाई नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने केवळ चिरीमिरीच्या विळख्यात न अडकता 'दिखाव्याची' कारवाई न करता, या वाई शहराच्या विकासाचा व भविष्यात सुंदर वाई स्वच्छ वाई या ब्रीदवाक्याचा विचार करावा व बातमीची गंभीर दखल घेऊन पुलावरील प्रत्येक अनधिकृत दुकान त्वरित हटवावे, अन्यथा शहरवासीय या निष्काळजीपणाचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत हे सांगायला ही कुठल्या ज्योतिषाची गरज उरणार नाही.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










