ग्रामीण भागातील वाढीवस्तीपर्यंत पोहोचलेले ड्रग चिंतेचा विषय
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
तरुणांना आकर्षित करणारे हे अमली पदार्थाचे लोन आता ग्रामीण भागातील वाडी वस्ती पर्यंत पोहोचले आहे. विशेषत: सातारा जिल्ह्यात ड्रग्जचे सापडत असलेले साठे हा चिंतेचा विषय बनला आहे.
मानसिक आजाराच्या रुग्णांवर प्रभावी उपचारासाठी मेफेड्रोन(एमडी) औषधाची निर्मिती जर्मनी कंपनीने केली होती परंतु मेफेड्रोन (एमडी) चा वापर नशेसाठी होऊ लागल्याने केंद्र सरकारने या औषधावर बंदी घातली. मेंदूला उत्तेजना निर्माण करणे व ते बराच काळ टिकवणे हा मेफेड्रोन (एमडी )चा प्रमुख गुणधर्म आहे. तरुणाईला याचे आकर्षण वाढल्याने याची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली.
ड्रग्ज माफीयाने केलेला विस्तार आता मुंबई पुणे नागपूर सारख्या मेट्रोसिटी पुरता मर्यादित न राहता त्याची पाळेमुळे आता थेट गाव वस्तीपर्यंतच्या तरुणाईपर्यंत पोहोचली आहेत. तरुणाईतील उत्साह व अमली पदार्थाचे आकर्षणापोटी नवतरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडत आहे हे विदारक चित्र व वास्तव रूप आता समाजामध्ये दिसून येत आहे. चंगळवादीवृत्तीतून निर्माण होणारी ही संस्कृती भविष्यात राष्ट्रहिताला बाधक ठरणार हे निश्चित याबाबत सामाजिक प्रबोधन व व्यापक चळवळ उभी करणे काळाची गरज बनली आहे.
नवतरुणांच्या मनावर प्रभाव पडणाऱ्या मेफेड्रोन (एमडी) विळखा तरुणाईला मारक ठरत आहे. अमली पदार्थाचा प्रसार व प्रचार ज्या वेगाने होत आहे ते भयानक आहे.तरुणांमध्ये या अमली पदार्थाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे भविष्यात देशासमोर एक मोठे संकट व आव्हान उभे राहणार आहे. चंगळवादी संस्कृतीच्या आहारी गेलेली तरुणाई जोशाने बेधुंद झालेल्या अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. रेव्ह पार्टीच्या व तारुण्यातील जोषाने बेधुंद झालेल्या तरुणाई अमली पदार्थांच्या व्यसनाधीन झाली आहेत. परिस्थितीचे भान नसलेल्या तरुणाई मधून नवी संस्कृती उदयाला येत आहे. विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या या तरुणाईला वेळेचे व्यसन घालणे गरजेचे आहे . अमली पदार्थांची सहज उपलब्धता हा चिंतेचा विषय आहे. मोठमोठ्या शहरांप्रमाणे छोट्या छोट्या शहरात ही आता अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. अप्पू,गांजा, चरस,हीरोइन बरोबरच आता मेफेड्रोन ( एमडी ) विळखा तरुणाईला पडला आहे. हा विळखा दूर करण्यासाठी तरुणाई मध्ये जनजागृती आवश्यक आहे. तरुणाईचे जीवन उध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थ व तस्कराबाबत कठोर धोरण गरजेचे आहे अन्यथा तरुणाईचा असलेला भारत देश व्यसनाधीन भारत म्हणून ओळखला जाईल. महासत्तेच्या स्वप्नपूर्तीला सुरुंग लावणाऱ्या शक्तीचे तरुणाई मध्ये व्यसनाधींचे बीज रोवत आहेत, हे तरुणाईने ओळखून अमली पदार्थ सेवनापासून परावृत्त होणे गरजेचे आहे.
आधुनिकतेने निर्माण झालेली चंगळवादी वृत्ती ही आजच्या तरुणाईची खरी फॅशन झाली आहे. बेफान व बेधुंद जीवन हा जगण्याचा एक राजमार्ग तरुणाईने स्वीकारला आहे. ही तरुणाई व्यसनाधीन तेकडे कळत नकळत वळली आहे. देशभरातील तरुणाईवर परदेशी संस्कृतीचा पगडा दिवसेंदिवस वाढत आहे.डान्सबार व पब संस्कृतीमुळे तरुणाई बेभान झाली आहे.या बेफान तरुणाईला अमली पदार्थांच्या सेवनासाठी तस्कराकडून प्रवृत्त केले जात आहे. उत्साहाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या तरुणाई बेधुंदपणे जगण्यासाठी अंमली पदार्थांचे सेवन घेण्यास भाग पडत आहे. गांजा, चरस, अफू,हीरोइन आणि मेफेड्रोन (एम डी) ने असंख्य तरुणाईस घेरले आहे. या अमली पदार्थांची नशाही तरुणांना बेधुंद करत आहे. इतर अंमली पदार्थाच्या तुलनेने एमडी ही अल्प किमतीत प्राप्त होत असल्याने तरुणाईचा ओढाही याकडे वाढला आहे. या पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असून त्याचे संपूर्ण देशभर मोठे रॅकेट उभे राहिले आहे.जम्मू-काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत या पदार्थाची मोठ्या प्रमाणात होणारी उलाढाल ही देशासमोर चिंतेची बाब आहे.
बेफाम बेधुंद झालेली तरुणाई आज नशेच्या आहारी जात आहे. चंगळवाद संस्कृतीमुळे तरुणाई बेहोश झाली आहे. तरुण वयातील ही मुले अफू गांजा चरस आणि आता मेफेड्रोन ( एम डी)ची शिकार झाली आहे. नशा शिवाय यांना जीवन जगता येत नाही. अशी परिस्थिती तरुणाईची झाली आहे. अमली पदार्थांचे सेवन ही त्यांची भूक बनली आहे. कॉलेज जीवनातील तरुण तरुणाई या अमली पदार्थाच्या सेवनाला बळी पडत आहेत पुणे मुंबई नागपूर सारख्या मोठ्या शहरात याचे प्रमाण अधिक असले तरी याचा प्रसार व प्रचार आता ग्रामीण स्तरावरील तरुणाईपर्यंत पोहोचला आहे ही दुर्दैवी बाब आहे.
श्रीरंग काटेकर
मानद अतिथी संपादक, शिवशाही न्यूज
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










