18 लाख 80 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी पवनचक्कीमधील तांब्याच्या केबल चोरी करणारी टोळी जेरबंद करून कारवाई केली असून त्यांच्याकडून एकूण पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल व वाहने मिळून सुमारे 18,80,014 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
दि 08 फेब्रुवारी 2025 ते 6 डिसेंबर 2025 दरम्यान सडावाघापुर व सडादाडोली परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमधील तांब्याच्या तार असलेल्या केबल वायरची चोरी झाल्याचे पाटण पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार गुन्हा नोंद करुन पुढील तपास सुरू होता.
या गुन्ह्याचा पाठपुरावा करताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय बातमीच्या माहितीवरून चार संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.
ताब्यात घेतलेले आरोपी :
1. सारीश संजय सावळवाडे (23), रा. आगाशिव नगर, कराड
2. दत्तात्रय जगन्नाथ झोरे (19), रा. सडावाघापुर, पाटण
3. निलेश श्रीमंत सुर्यवंशी (27), रा. पाबळवाडी, पाटण
4. प्रमोद सरेश निकम (26), रा. मसूर, कराड
यांनी पवनचक्कीमधील केबल वायर चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर पाटण, सातारा तालुका व उंब्रज पोलिस ठाण्याचे एकूण ५ गुन्हे उघड झाले. या गुन्ह्यात 17,76,014 रुपये किमतीच्या केबल वायर व मशीन तसेच 1 लाख रुपये किमतीचा टेम्पो व वजनकाटा जप्त करण्यात आला आहे. आरोपींना 15 डिसेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे.
या कारवाई मध्ये पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रमेश गर्जे, रोहित फार्णे, पोउनि परितोष दातीर, विश्वास शिंगाडे, सफौ. अतीष घाडगे, पोहवा विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, शरद बेबले, लेलैश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, स्वप्नील कुंभार, गणेश कापरे, ओंकार यादव, स्वप्नील शिंदे, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर, संकेत निकम, चालक सफौ. शिवाजी गुरव यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पालीस अधीक्षक, सातारा, व अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










