शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या तर्फे दिनदर्शिका वाटप

शैक्षणिक गुणवत्ता वाढ करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

Calendar publication, Mahesh dhamdhere, education, shirur, pune, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)

तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला व रेनबो इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांमध्ये व महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांच्या हस्ते संस्थेतील सर्व शिक्षक वृंदांना नवीन वर्षाची दिनदर्शिका वाटप करण्यात आली या कार्यक्रमात महेश ढमढेरे यांनी शिक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देताना शैक्षणिक गुणवत्ता वाढ करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. 

दिनदर्शिकेच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम महत्त्वाचे दिवस व नियोजन अधिक सुसूत्रपणे करता येते असे त्यांनी यावेळी नमूद केले.

विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी शिक्षकांसाठी शिक्षकांनीच स्थापन केलेल्या पहिल्या  विद्या सहकारी बँकेच्या माध्यमातून संस्थेतील शिक्षक सभासदांना दिनदर्शिकांचे वाटप केले. या उपक्रमामागील मूळ उद्देश शिक्षण संस्था, शाळा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे असून शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन अधिक शिस्तबद्ध व प्रभावीपणे व्हावे यासाठी या दिनदर्शिका उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य पराग चौधरी , सर्व प्राध्यापक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.त्याचप्रमाणे स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन ओमासे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुनंदा लोले व त्यांचा सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. 

यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे सचिन पंडित व तळेगाव ढमढेरेचे युवा उद्योजक सोमनाथ ढमढेरे हेही उपस्थित होते. महेश ढमढेरे यांच्या या उपक्रमामुळे शिक्षकांमध्ये नवीन वर्षाची उत्साहात सुरुवात झाली व एक सकारात्मक ऊर्जा शालेय वातावरणात निर्माण झाली.

---------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

------------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

-----------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !