मंत्री नेते व मान्यवरांच्या उपस्थितीत घेतले शिवसेनेचे शिवधनुष्य हाती
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
बावधन गावातील उत्कृष्ट युवा संघटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते विक्रम वाघ यांनी काल फलटण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पालकमंत्री शंभूराज देसाई व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील गृहराज्यमंत्री योगेश कदम आमदार निलेश राणे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर संजीव राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करून शिवसेनेचे शिवधनुष्य हाती घेतले. वाघ यांच्या या प्रवेशामुळे बावधन गट व गणातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मराठा समाजातील युवकांना संघटित करून प्रभावी नेतृत्व उभे करणारे विक्रम वाघ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला ग्रामीण भागात मोठे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात बावधन परिसरातील राजकारणात निर्णायक बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रवेशप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, जिल्हा संघटक राजू केंजळे, जिल्हा विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शिवसेना वाई विधानसभा अध्यक्ष प्रताप भिलारे, शिवसेना वाई तालुकाध्यक्ष रवींद्र आप्पा भिलारे शिवसेना वाई शहराध्यक्ष गणेश सावंत उपस्थित होते.
विक्रम वाघ यांच्या शिवसेना प्रवेशाने वाई तालुका बावधन परिसरातील राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










