शोषितांच्या न्यायासाठी भारतीय बहुजन पालक संघ सदैव सज्ज
शिवशाही न्यूज,शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
नाताळ निमित्ताने माणिकचंद हाॅस्टपीटल (रुबी हाॅल क्लिनिक) चा प्रमुख मनमानी व मुजोर कारभार करणारा मुख्य व्यवस्थापन अधिकारी मायकल पाॅल ला कान धरून सर्व हॉस्पिटल मधील कर्मचारी आणि रुग्ण यांच्या समोर माफी मागायला लागले. सदर दवाखाना धर्मदाय अंतर्गत सेवा देत नसल्याने नाथा भाऊ पाचर्णे यांनी सदर चालू असलेली रुग्णाची बेसुमार लूटमार,गरीब आणि सामान्य रुग्णांना जाणीवपूर्वक शासकीय योजनांपासून वंचित ठेवून आर्थिक लूटमार करणारी सिस्टम बदलणे बाबत विचारणा केली तर सदर पाॅल हा अधिकारी हा नाथाभाऊ पाचर्णे यांच्या अंगावर धावुन येऊन त्याने अरेरावी केली व आरडाओरडा करत असल्याने मग त्याची जागा त्याला आज दाखविण्यात आली.
कारण ही सर्वसामान्य शिरूरकरांची जागा फुकट देण्यात येऊन स्वर्गीय रसिकभाऊ धारीवाल यांनी ५ रुपयात गरीबांना वैदयकीय सेवा मिळावी म्हणून भाऊंनी धर्मदाय मार्फत मातोश्री मदनबाई माणिकचंद धारिवाल हॉस्पिटल चालू करून गोरगरीब आणि सामान्य रुग्णांना उपचार या हेतूने चालू केला होता. पण आताचे माणिकचंद हॉस्पिटलचे ट्रस्टी व रुबी हॉस्पिटलचे प्रशासन रुग्णाला लुटतात. तरी नवीन नगरसेवक लोकप्रतिनिधीनी सदर गंभीर विषयात लक्ष घालून गोरगरीब रुग्णांना रुग्णाला न्याय मिळावा यासाठी काम कराव.
या संघर्षामुळे अडागळे कुटुंबाचे तब्बल रुपये ५०,०००/- वाचले असून, संबंधित कुटुंबाने भारतीय बहुजन पालक संघाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
तसेच सरकारी जागेवर चालणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाने गरीब, गरजू व अपघातग्रस्त रुग्णांची आर्थिक लूट केल्यास संघटना ती कदापि सहन करणार नाही. अशा प्रकारांवर कठोर आंदोलन, कायदेशीर कारवाई होण्यासाठी संबंधित विभागांकडे तक्रारी व पाठपुरावा करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
गरीब, पिडीत व शोषितांच्या न्यायासाठी भारतीय बहुजन पालक संघ सदैव मदतीसाठी सज्ज आहे.
----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




