मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ( सेमी इंग्रजी)बालाजी विश्व प्री स्कूल या विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दि.24डिसेंबर रोजी उत्साहात साजरे झाले.शिरूर पंचक्रोशीत स्वतःचे वेगळे स्थान असणारी बालाजी ही एकमेव संस्था आहे .बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन आनंदात आणि जल्लोषात पार पडले .विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध कार्यक्रमांचे विद्यालयांमध्ये आयोजन करण्यात आले होते. वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने भारतीय संस्कृती जपणारी आणि इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव करून देशाला नवचैतन्य देणारे वंदे मातरम नाद एकम रुपम अनेक ही उत्कृष्ट थीम घेऊ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.सदाशिव आण्णा पवार होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल मा. श्री शिशिर महाजन (रिटायर्ड), फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड चे हेड श्री प्रवीण गुळवे,मेजर श्री शरद कोठावळे सुभेदार श्री सुरेश उमाप, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य श्री नीरज रायसर, डेक्कन एज्युकेशन स्कूलचे प्राचार्य डॉ. समीर सर, , बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक म्हसवडे , बालाजी इंग्लिश माध्यम स्कूल विद्यालयाचे मुख्याध्यापक पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वसंत गव्हाणे, दत्तात्रय कापरे, विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पालक शिक्षक संघाचे सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती , नटराज मूर्ती पूजनाने तसेच,दीप प्रज्वलनाने झाली. विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत केले. सर्व मान्यवरांचे सत्कार शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ,व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात. शैक्षणीक, क्रीडा, गायन, वादन, नृत्य शालाबाह्य व शालान्तर्गत स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुख्याध्यापक विनायक म्हसवडे यांनी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. तसेच त्यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व विद्यालयातील उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
गणेश वंदनेने विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम सुरू झाला. वंदे मातरम या संकल्पनेतून देशप्रेम, एकता व संस्कार यांचा संदेश देण्यात आला.कार्यक्रमात गायन वादन, तसेच मनोरंजनात्मक व देशभक्तीपर कार्यक्रम सादर झाले. देशभक्तीपर समूहगीत ,भारुडे, देवदेवतांचा महिमाआदी, कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता.
हे सर्व पाहून सन्मानीय पाहुण्यांनी सदाशिव आण्णा पवार यांच्या संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यासाठी वेगवेगळ्या करिअरच्या संधी आहेत त्या संधी ओळखून आपल्या पाल्यास मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. तसेच देश सेवा करण्यासाठी देखील आर्मी नेव्ही सारखे क्षेत्र आहेत त्याचा विचार करावा असे सांगितले. अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होत असतात ते आपण आत्मसात करणे गरजेचे आहे असे सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला असून उपस्थित प्रेक्षकांनी उपस्थित प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला.
विद्यालयाचे प्राचार्य श्री विनायक म्हसवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.सौ ललिता पोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी सूत्र संचालन व कार्यक्रमाचे नियोजन केले. उपप्राचार्य सौ स्वाती चत्तर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



