मानवता धर्म एकच मानून जनतेची सेवा करावी
शिवशाही वृत्तसेवा, आटपाडी
दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन पुणे तर्फे आटपाडी येथे जावून समाजसेवक उत्तम जाधव यांची आटपाडी नगराध्यक्षपदी निवड झाल्याने परिवार सदस्य म्हणून संस्थेचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे हस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची एकत्रित प्रतिमा,शाल, पुष्पगुच्छ तसेच महापुरुषांचे ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी समाजसेवक बजरंग फडतरे, संपादक अंकुश मुडे व इतर मान्यवर उपस्थितीत होते.
याप्रसंगी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की आटपाडी शहराचे प्रथम नागरिक म्हणून उत्तमरावानी कोणताही भेद भाव न करता जातीने लक्ष घालून प्रत्येक वॉर्डातील रस्ते पाणी आरोग्य सेवा सुविधा व इतर मूलभूत गरजा परिपूर्ण करून आपल्याच घरातील व्यक्ती म्हणून नावलौकिक या पुढेही मिळवावा.नियमित रक्तदान शिबिर आयोजित करावे. जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा समजून जास्तीजास्त आपला वेळ समाजकार्यासाठी देऊन फुले दांपत्याचे कृतिशील कार्याचा वसा पुढे नेऊन आपल्या गावातील वाड्या वस्त्यावरील गरीब मुलांना चांगले शिक्षण घेण्यासाठी मदत करावी.मानवता धर्म एकच मानून जनतेची निस्सिम सेवा करावी असे देखील म्हटले.
या सरकारास उत्तर देताना नगराध्यक्ष जाधव म्हणाले की मला आटपाडी जनतेने प्रथम नागरिक म्हणून भरघोस मतांनी निवडून दिले त्या संधीचे सोने करून कोणताही दूजाभाव न करीता आटपाडी शहर अनेक कारणांनी साहित्यिक लेखक व ऐतिहासिक कारणांनी प्रसिद्ध आहे त्याला गालबोट न लागता त्यामध्ये भर टाकून जास्तीजास्त नावलौकिक ,शहराचा विकास आणि येथील तरुणांना याच ठिकाणी उत्तम रोजगार संधी ,शेतकरी बांधवाना आधुनिक तंत्रज्ञानाची सोय करून देऊ
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



