आरोग्य तपासणी शिबीर व उपचार शिबिराचा रुग्णांना लाभ
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आरोग्य तपासणी शिबीर व जाग्यावरच उपचार करून वैद्यकिय सुविधा देत समाजाचे आरोग्य सांभाळणा-या जयहिंद गणेश उत्सव मंडळ विजयनगर भुईंज यांनी ख-या अर्थाने गणेश उत्सवाचा उत्साह जपत विधायक कृतीतून आपले समाजकार्य उभे केले असे प्रतिपादन भुईंजचे सरपंच विजय वेळे यांनी केले.
भुईज ता. वाई येथील जयहिंद गणेश उत्सव मंडळ विजयनगर भुईज यांनी गणेश उत्सावानिमित्त विविध उपक्रम राबवले यापैकी आरोग्य तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले. मिरज येथील सेवासदन मल्टिस्पेशालिटी व सातारा येथील एन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या पुढाकारातून मंगळवारी दिवसभर हे शिबीर संपन्न झाले. याचे उद्घाटन करताना सरपंच विजय वेळे बोलत होते.
यावेळी बोलताना सरपंच वेळे म्हणाले भुईज गावाला सर्वांगीण विकासाचा वारसा आहे. येथे प्रत्येक मंडळाने विविध उपक्रम राबवून गावाचे गावपन जपले आहे याही मंडळाने दोन पाऊले पुढे जात हि परंपरा आदर्श केली आहे. भुईज ग्रामपंचायत या उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करेल असे हि ते यावेळी म्हणाले.
यावेळी उपसरपंच शुभम आण्णा पवार, माजी सरपंच अर्जुन भोसले, उद्योजक सुनिल शेवते, शिवसेना नेते अतुल जाधवराव, ग्रामपंचायत सदस्य चेतन दाभाडे, नंदकुमार खरे, चंद्रशेखर भोसले, जितूनाना जाधवराव, डॉ. विनित भोसेकर आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष साहिल दाभाडे, उपाध्यक्ष रोहित शेवते, अमोल कोळेकर, प्रज्वल इथापे, अनिकेत शेटे, शुभम निकम यांनी केले सुत्र संचालन अथर्व खरे यांनी केले आभार ग्रामपंचायत सदस्य चेतन दाभाडे यांनी मानल.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा