जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी झाली निवड
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत आयोजित विज्ञान मेळाव्यात “क्वांटम युगाची सुरुवात” या विषयावर तालुकास्तरीय स्पर्धा सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात पार पडली.
या मेळाव्यात तालुक्यातील जवळपास २५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर (कन्नड) येथील विद्यार्थिनी आकांक्षा दलपत चव्हाण हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. तिची जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. टी. शिंदे उपस्थित होते. पंच म्हणून विनायकराव पाटील कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. संतोष मतसागर, डॉ. युसूफ शेख व श्रीराम काळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संजय त्रिभुवन यांनी केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष साबुसिंग राठोड, उपाध्यक्ष श्रामदास सुरडकर, सचिव पांडुरंग राठोड, सहसचिव संजय पुरी, कोषाध्यक्षा सरलाताई सोनवणे, संचालक शिवाजी वाघ, संचालक मुकुंद शिंदे, मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आकांक्षा व तिच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














