नेत्रदीपक कामगिरीमुळे 'प्रशासन विभागाचा' सुरज यादव ठरला मालिकावीर
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
अजिंक्य उद्योग समूहाचे दूरदृष्टीचे व द्रष्टे नेतृत्व, साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा सह. साखर कारखाना आणि कामगार 'श्री' गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साखर कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचा आणि त्यांच्यातील ऊर्जा, एकोपा आणि क्रीडाभाव वाढवण्याचा एक अभिनव उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने अजिंक्यतारा कामगार 'श्री' गणेशोत्सवात दि. २९ व ३० ऑगस्ट रोजी साखर कारखाना कार्यस्थळावर अजिंक्यशुगर प्रीमियम लीग २०२५ भव्य हाफ पीच क्रिकेट, रस्सी खेच व दुहेरी बॅडमिंटन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन परिसरात घेण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धांना अधिकारी व कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण मोठ्या थाटात पार पडले.
साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत यांच्या हस्ते, तसेच माजी चेअरमन सर्जेराव सावंत, संचालक बजरंग जाधव, पै. सत्पाल फडतरे, सयाजी ताटे-पाटील तसेच सर्व खातेप्रमुख, कामगार युनियनचे अध्यक्ष दिलीप शेडगे व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ उत्साही वातावरणात पार पडला.
साखर कारखान्याचे कामगार कल्याण अधिकारी ऍड. रणजित चव्हाण म्हणाले, अजिंक्यतारा साखर कारखान्यातर्फे कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमाबरोबरच यंदा क्रीडा स्पर्धांचाही समावेश करण्यात यावा, अशी संकल्पना आदरणीय महाराजसाहेब व कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते साहेब यांनी मांडली होती.
क्रीडा स्पर्धातील कामगारांच्या सहभागामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळण्यास मदत होऊन त्यांच्यात संघभावना वाढीला लागावी या हेतूने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्याने संकल्पना आणि हेतू सार्थकी लागल्याची भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
साखर कारखान्याचे सेक्रेटरी बशीर संदे यांनी क्रीडा स्पर्धेतील सहभागी व विजयी संघांचे, संयोजन समितीचे व अधिकारी -कामगारांचे अभिनंदन करून आनंदमयी आणि उत्साही सोहळ्याचे कौतुक केले.
पांडुरंग कणसे सर व विष्णू जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रविण जाधव साहेब यांनी आभार मानले.
पारितोषिक विजेत्या संघास उपस्थित मनावरांच्या हस्ते पुढील प्रमाणे रोख बक्षीस व आकर्षक 'अजिंक्य' चषक देवून गौरविण्यात आले.
रस्सीखेच स्पर्धा विजेते
प्रथम क्रमांक -अजिंक्यतारा इलेव्हन सुरक्षा विभाग रु.रूपये ५००१/-
द्वितीय क्रमांक -अजिंक्य खलाशी इंजिनियरिंग विभाग रूपये ३००१/-
तृतीय क्रमांक - अजिंक्य बायोफ्युएल डिस्टलरी विभाग रूपये २००१/-
चतुर्थ क्रमांक -अजिंक्य सिव्हिल ब्रेव्हहार्ट रूपये १००१/-
या स्पर्धेत पंच म्हणून पांडुरंग कणसे व परीक्षक म्हणून महेंद्र जाधव म्हणून काम पहिले
दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा विजेते
प्रथम क्रमांक - दिनेश चव्हाण व सूरज सावंत (डिस्टीलरी ) रूपये ३०००/-
द्वितीय क्रमांक - राजाराम कणसे व नितीन भोसले (टाईम ऑफिस व संगणक ) रूपये २०००/-
तृतीय क्रमांक - दिग्विजय पाटील व महेश हुमणे (संगणक ) रूपये १०००/-
चतुर्थ क्रमांक - सुरेश धायगुडे व भगवान पवार (उत्पादन व पर्यावरण ) रूपये ५००/-
या स्पर्धेत पंच म्हणून भगवान पवार व राजाराम कणसे यांनी व गुण लेखक म्हणून अक्षय गायकवाड यांनी काम पहिले
क्रिकेट स्पर्धा विजेते
प्रथम क्रमांक- अजिंक्य MFG रॉयल्स उत्पादन विभाग रूपये ७०००/-
द्वितीय क्रमांक अजिंक्य राजधानी रायडर्स अकॉउंट विभाग रूपये ५०००/-
तृतीय क्रमांक अजिंक्य प्रशासन सुपर किंग्स प्रशासन विभाग रूपये ३०००/-
चतुर्थ क्रमांक अजिंक्य कॅप्टन इंजिनियरिंग विभाग रूपये २०००/-
वैयक्तिक पारितोषिक विजेते
मालिका वीर - सुरज यादव प्रशासन, सामनावीर (अंतिम सामना)- अशोक सपकाळ उत्पादन, सर्वोत्कृष्ट फलंदाज - चेतन घोरपडे इंजिनियरिंग, सर्वोत्कृष्ट गोलंदाज - अंकुश सूर्यवंशी उत्पादन, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक - उदय पाटील शेअर्स, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक - सुरेश धायगुडे, सर्वोत्कृष्ट षटकार - सुरज किर्दत तोडणी वाहतूक , सर्वोत्कृष्ट विकेट - निवास कदम उत्पादन, सर्वोत्कृष्ट झेल - शुभम गुरव अकाउंट , आणि सर्वोत्कृष्ट संघ - अजिंक्य राजमुद्रा वारियर्स शेती यांना प्रत्येकी ५०० रुपयांची वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.
या स्पर्धेचे समालोचन विनीत शिंदे यांनी केले.पंच म्हणून शेखर कोळेकर, मोहन पवार सर, अंकुश जांभळे यांनी तर गुण लेखक म्हणून सचिन यादव, महेश हुमणे यांनी काम पहिले
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा