लहान मुलांसाठी फळे, मिठाई, पाणी, सरबत वाटप
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर (प्रतिनिधी फैजल पठाण)
गणपती उत्सव आणि पैगंबर जयंती ही दोन्ही धर्मीयांना आनंदाने व उत्साह पूर्ण वातावरणामध्ये साजरी करण्यात यावी यासाठी पोलीस प्रशासन व दोन्ही समाजातील लोकांनी एकत्रित येऊन शिरूर शहराचा सामाजिक व धार्मिक सलोखा कायम ठेवत सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी पैगंबर जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला व यानिमित्ताने मुस्लिम समाजाच्या (निशान) या झेंड्याला पुष्पहार घालून लाटेआळी या ठिकाणाहून या मिरवणुकीची सुरुवात झाली अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
हा जुलूस संपूर्ण शहरांमधून जात असताना अनेक चौकामध्ये लहान मुलांसाठी फळे, मिठाई, पाणी, सरबत असे अनेक स्टॉल लागले होते. तर काही ठिकाणी भाईचारा अबाधित राहावा म्हणून तर मुलींचे महत्त्व सांगणारे पोस्टर तर भारतीय सैन्य दलातील महिला कर्नल सोफिया कुरेशी (ऑपरेशन सिंदूर) हिचे अभिनंदन करतानाचे पोस्टरही या कार्यक्रमात झळकवण्यात आले. हा जुलूस मदिना मज्जिद च्या ग्राउंड वर आल्यानंतर त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली होती. या कामी शिरूर पोलीस प्रशासनाने अतिशय शिस्तबद्ध व चोख बंदोबस्त पार पाडला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














