वाई वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी व वनकर्मचारी यांनी टाकला छापा
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सिद्धनाथवाडी ता वाई येथील ज्ञानेश्वर धोंडीबा वाघ यांचे राहत्या घरात वन्यपक्षी पोपट एक बंदिस्त करून ठेवल्याची माहिती मिळाल्यावर वाई वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी व वनकर्मचारी यांनी छापा टाकला असता ज्ञानेश्वर धोंडीबा वाघ यांच्या घरात पिंजऱ्यामध्ये विनापरवाना बंदिस्त करून ठेवलेला वन्यपक्षी अलेक्झांडर पॅराकिट प्रजातीचा पोपट नर एक मिळून आला. वन अधिकारी यांनी कारवाई करून बंदिस्त करून ठेवलेला पोपट जप्त करून ताब्यात घेतला. वन्यपक्षी पोपट बंदिस्त करून ठेवले बाबत वन्यजीव संरक्षण च्या कायद्यान्वये वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. उपवनसंरक्षक सातारा अमोल सातपुते, मा. सहाय्यक वनसंरक्षक वनीकरण सातारा प्रदीप रौंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाई वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली. वाई वनक्षेत्र पाल एम. एस. हजारे यांनी शिवशाही न्यूज शी बोलताना सांगितले की वाई तालुक्यातील सर्व ग्रामस्थांना आवाहन करण्यात येते की वन्यपक्षी, वन्यप्राणी पाळणे, बंदिस्त करून ठेवणे, वन्यप्राण्याचे अवयव बाळगणे तसेच वन्यप्राण्यांची शिकार करणे हे वन कायद्यानुसार वनगुन्हा असून अशी घटना कोणाच्या निदर्शनास आल्यास त्या बाबतची माहिती वनविभागास कळवून वनविभागाला सहकार्य करावे व माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














