नागरिकांनी उत्सव काळात शांतता, ऐक्य व सलोखा राखण्याचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे )
आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या वतीने ग्राम दुसरबीड येथे मंगळवारी रूट मार्च काढण्यात आला.
मा. पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्या सूचनेनुसार हा रूट मार्च दुपारी 4.30 ते 5.30 या वेळेत काढण्यात आला. रूट मार्चचा मार्ग पोलीस चौकी दुसरबीड, राजे संभाजी चौक, टिपू सुलतान चौक, दादामिया मस्जिद, घुगे गल्ली, जय गजानन चौक, एचडीएफसी बँक, मेन रोड मार्गे पार पडून पुन्हा पोलीस चौकी दुसरबीड येथे समारोप झाला.
या रूट मार्चमध्ये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार संजय मातोंडकर दुय्यम ठाणेदार, २० पोलीस अंमलदार, १ RCB पथक तसेच ३० होमगार्ड सहभागी झाले होते.
ठाणेदार संजय मातोंडकर यांनी सांगितले की, “गणेश विसर्जन मिरवणुका व ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी उत्सव काळात शांतता, ऐक्य व सलोखा राखावा.”
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










