कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रुटमार्च द्वारे संदेश
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुईंज- पाचवड परिसरात भुईज पोलीसांनी भव्य रूट मार्च काढून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचा दृढ संदेश दिला. या रूट मार्चच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासह जोर दिला गेला.
भुईंज पोलिस स्टेशनचे सपोनी रमेश गर्जे यांच्यासह दोन अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड सहभागी झाले होते. यावेळी सपोनी रमेश गर्जे यांनी सांगितले की, गणेशोत्सव, नवरात्र किंवा कोणताही सामाजिक कार्यक्रम असो पोलीस प्रशासन नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असते. कायदा सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणे ही आमची जबाबदारी आहे.
गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाने विशेष योजना आखली आहे. यामध्ये वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन, महिलांची सुरक्षा, मुलांचे संरक्षण आणि आपत्कालीन सेवांशी समन्वयाचा समावेश आहे. तसेच नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी रूटमार्च च्या माध्यमातून पोलिसांचे लक्ष राहील.
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. की, उत्सव काळात पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कायद्याचे पालन करावे आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करावा. पोलीस प्रशासनाची तत्परता आणि नागरिकांशी संवाद यामुळेच सार्वजनिक कार्यक्रम सुरक्षितपणे व्यवस्थित पार पडतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










