शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण यांची शिरूर तालुक्यात परिक्षक म्हणून निवड
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर
राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा "राज्य महोत्सव" म्हणून साजरा करण्यात येत आहे याबाबतचा निर्णय शासनाने शासन निर्णय क्रमांक पुलदे -२०२५/प्र.क.११४/(१२५५४१२)सां.का.२ दि.१४/०८/२०२५ अन्वये घेतलेला आहे. त्या अनुषंगाने विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व मंडळाची पुरस्कारासाठी निवड होण्यासाठी खालील प्रमाणे निकष ठरवण्यात आले आहेत.
- कलांचे जतन व संवर्धन
- सांस्कृतिक जतन व संवर्धन
- निसर्गाचे व सार्वजनिक संपत्तीचे जतन व संवर्धन
- सामाजिक कार्य
- गणेशोत्सव आयोजनातील विधायकता.
या स्पर्धा साठी संचालक पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी हे समन्वयक असून स्पर्धेत केवळ नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक मंडळे सहभागी होऊ शकतील पात्र अर्जदार मंडळांनी अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले असून पोर्टल द्वारे विहित वेळेत आपला अर्ज सादर करायचा आहे गणेशोत्सव स्पर्धे अंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी चालू आर्थिक वर्षाच्या मागील सलग दोन वर्ष राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारितोषकात पात्र ठरणार नाही सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मंडळांसाठी त्यांनी केलेल्या कामाचा कालावधी मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशी पर्यंत असेल स्पर्धेच्या परीक्षणासाठी निवड समितीने दिलेल्या दिवशी व वेळी संबंधित कागदपत्रे व माहिती समितीला उपलब्ध करून देणे ही संबंधित मंडळाची जबाबदारी असेल .सदर गणेशोत्सव स्पर्धेतील तालुकास्तरीय निवड समितीने घेतलेल्या निर्णयावर कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आक्षेप घेता येणार नाही. विजेत्या गणेशोत्सव मंडळात स्पर्धेतील त्यांनी प्राप्त केलेल्या सर्वोच्च पुरस्काराची रक्कम देण्यात येईल.
तालुकास्तरीय निवड समिती प्रत्यक्ष उत्सव स्थळी भेट देऊन उत्सव स्थळाचे उच्च दर्जाचे छायाचित्रण ,व्हिडिओ रेकॉर्डिंग व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कागदपत्रे जमा करून घेईल प्राप्त निकषानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे परीक्षण करून मार्गदर्शक सूचनांनुसार अभिप्रायासह, गुणांकन करून सदर समिती आपल्या तालुक्यातील एका विजेच्या मंडळाचे निवड करून सदर गणेशोत्सव मंडळाचे शिफारस जिल्हास्तरीय परीक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे करतील तालुकास्तरीय जास्तीत जास्त मंडळाचे सदर स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
या जिल्हा व तालुकास्तरीय सर्व निवड समिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेश व मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी डि. वाय. एस. पी प्रशांत ढोले यांच्या सूचनेप्रमाणे व तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी बाळासाहेब मस्के यांच्या आदेशानुसार व शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , शिरूर मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या संयुक्त मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बापू सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ५५ गणेश मंडळांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन माहिती घेण्यात आली.
यामध्ये शिवशाही न्यूज नेटवर्कचे पत्रकार फैजल पठाण यांच्यासह पत्रकार प्रवीण गायकवाड, डॉ. संतोष पोटे, प्राचार्य सुनंदा लंघे , सविता बोरुडे,परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असून तसेच शहरातील विसर्जन मिरवणूक परीक्षण करून काही दिवसात गणराया अवॉर्ड घोषित करण्यात येणार असून राज्य शासनाकडून२५,००० हजार रुपयांचे पारितोषिके देऊन गणपती मंडळांना सन्मानित करण्यात येणार आहे . या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तशा सूचना व मार्गदर्शन महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळांना व पदाधिकाऱ्यांना केल्या असून यावर्षीचा गणेश उत्सव शांतता, आनंदमय व भक्तीमय तसेच शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














