अखिल भारतीय ग्राहक पंचायत व तेज न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी गणपती सजावट स्पर्धा संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
आपल्या सर्वांचा आवडता सण म्हणजे गौरी गणपती उत्सव आहे. आणि या उत्सवामध्ये घरात सजावट करताना जो आनंद मिळतो तो सर्वात मोठा आनंद असतो. महिलांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सण उत्सवाच्या वेळी होणाऱ्या घरगुती सजावटी निमित्ताने अशा स्पर्धांची गरज आहे. गौरी गणपती स्पर्धा घेणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे समाज प्रबोधन केले जाते.असे मत ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी व्यक्त केले.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील यशश्री अकॅडमीच्या येथे एलआयसी अखिल भारतीय ग्राहक पंचायत व तेज न्यूज यांच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून एलआयसीचे विकास अधिकारी बी एस चौगुले, ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये, सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत देशपांडे, सेवानिवृत्त तलाठी धोंडीराम शिंदे, डॉ. नवनाथ खांडेकर,प्रा. डी एस माळवदे,शहाजी जाधव व संचालक प्रवीण लिंगडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शशिकांत हरिदास म्हणाले की ग्राहक पंचायत ही ग्राहकांची चळवळ असून आपले हक्क आणि कर्तव्य पार पाडत असताना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आपण ग्राहक पंचायतच्या माध्यमातून होणारा अन्याय दूर करू शकतो. यावेळी बी एस चौगुले म्हणाले की ,आपण एलआयसीच्या माध्यमातून ग्राहकांना बचत आणि सुरक्षितता प्रदान करतो. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी एलआयसी विमा असणे ही काळाची गरज झाली आहे.
या कार्यक्रमातील विजेते पुढील प्रमाणे ज्योती शशिकांत विभुते, सविता बाळासाहेब कापसे, गीतांजली गणेश ताटे, कुसुम धोंडीराम शिंदे, आकांक्षा आनंद देशपांडे यांचा शाल, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती माळवदे यांनी केले तरी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची माळवदे यांनी केले तर आभार प्रशांत माळवदे यांनी मानले. या कार्यक्रमास महिला विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














