छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली " गणेश उत्सवानिमित्त" निमित्त मौजे वेलंग (उंबरवाडी) , ता. वाई येथे महसूल विभागामार्फत कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कॅम्प मध्ये जवळजवळ 36 रेशन कार्ड नाव नोंदणी करणे 420 आधार कार्ड अपडेट 21 सातबारा दुरुस्ती व उत्पन्नाचे दाखले 26 असे विविध दाखले अनेक नागरिकांना देण्यात आले.
या कार्यात मंडळ अधिकारी धोम श्रीकांत धनावडे, ग्राम महसूल अधिकारी सौ. शितल वाघ, निलेश भोसले, संतोष जगताप तसेच महसूल सेवक संजय पवार, दत्तात्रय काळे व दगडू तुपे हे उपस्थित होते व वरद हॉस्पिटल आय सी यु च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन डॉक्टर शैलेंद्र धेंडे डॉक्टर विशाल मांढरे अंकिता साळवी विशाल पोळ श्रीधर यादव व भोसले हॉस्पिटलच्या डॉक्टर दामिनी भोसले स्त्रीरोग तपासणी केली व प्राथमिक आरोग्य केंद्र मालपुर यांचाही सहभाग होता
राहुल भोई कुणाल गोस्वामी शांताराम मदने आशा सेवीका सविता जाधव यांनीही या मोफत आरोग्य तपासणी केली मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग नोंदविला होते या शिबीरास वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे व लोकनेते बापूसाहेब शिंदे यांनी भेट दिली व स्थानिक स्तरावर उपसरपंच कृष्णदेव जाधव, पोलीस पाटील सौ. सविता जेधे यांच्यासह ग्रामस्थ विशाल जाधव किरण जाधव उमेश जाधव सचिन पिसाळ अजय गायकवाड , दीपक काकडे, समीर जाधव, सुरेश वाघ, किरण जाधव, सुनील सूर्यवंशी प्रवीण जाधव संदीप जाधव व इतर मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














